इगतपुरी पोलिसांच्या वाहनाला अपघात
By admin | Published: September 9, 2016 12:23 AM2016-09-09T00:23:08+5:302016-09-09T00:23:16+5:30
इगतपुरी पोलिसांच्या वाहनाला अपघात
घोटी : राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संरक्षण ताफ्यातील इगतपुरी
पोलीस ठाण्याच्या पोलीस वाहनाचा आज सकाळी बोरटेंभे शिवार भीषण अपघात होऊन या
अपघातात कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
झाले. या दोन्ही जखमींना
उपचारार्थ नाशिकला हलविण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्यमंत्री दादा भुसे हे आज सकाळी मुंबईहून नाशिककडे जात असताना इगतपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घाटनदेवी मंदिरापासून या संरक्षण ताफ्यात पोलीस वाहनाने (क्र. एमएच १५ इए १३२) पेट्रोलिंग करीत असताना बोरटेंभे शिवारात वाहनाचे समोरील टायर फुटल्याने हे रस्त्यालगत उभे असलेल्या टॅँकरवर (क्र. एमएच ०४ इएल ९९८८) जाऊन आदळले.
या अपघातात पोलीस वाहनाचे चालक डी़एस. गायकवाड यांच्यासह एस.एस. लोहरे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, कर्मचारी नितीन भालेराव, संदीप झालटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना उपचारार्थ नाशिकला हलविले. इगतपुरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला
आहे. (वार्ताहर)