कसारा घाटात अपघात; रिक्षाचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:16 PM2020-05-11T23:16:55+5:302020-05-11T23:24:26+5:30
इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये सोमवारी (दि. ११) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एक दांपत्य आपल्या मुलासह वसईहून उत्तर प्रदेशकडे रिक्षाने जात असताना रिक्षा दुभाजकावर आदळून चालक जागीच ठार झाला.

कोरोना संसर्गामुळे मुंबईतील मजूर आपापल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने जात आहेत. वसई येथून संध्याकाळी राजेशकुमार यादव (४६)े पत्नी व मुलगा यांना घेऊन स्वत: रिक्षा (क्र. एमएच ०२ डीयू २२६४ ) चालवीत उत्तर प्रदेशकडे या रिक्षाने निघाले होते. पहाटेच्या सुमारास यादव यांची रिक्षा मुंबई - आग्रा महामार्गावरील कसारा घाटात दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात राजेशकुमार यादव हे जागीच ठार झाले.
महामार्ग पोलिसांनी यादव यांना इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यादव यांच्या कुटुंबावर दु:खाचा मोठा आघात झाला असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने इगतपुरीतील स्मशानगृहात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर पत्नी व मुलाला पुन्हा वसईला पाठवण्यात आले.