खोरी फाटा येथे अपघात; शिक्षक गंभीर, पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:09 AM2019-04-23T01:09:50+5:302019-04-23T01:10:32+5:30

चांदवड तालुक्यातील निवडणुकीची सभा आटोपून परतत असताना वणी-सापुतारा रस्त्यावर पुलासाठीच्या खड्ड्यात स्विफ्ट कार कोसळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला आहे.

Accident at Khari Phata; Teacher serious, wife killed | खोरी फाटा येथे अपघात; शिक्षक गंभीर, पत्नी ठार

खोरी फाटा येथे अपघात; शिक्षक गंभीर, पत्नी ठार

Next

वणी/सुरगाणा : चांदवड तालुक्यातील निवडणुकीची सभा आटोपून परतत असताना वणी-सापुतारा रस्त्यावर पुलासाठीच्या खड्ड्यात स्विफ्ट कार कोसळून झालेल्या अपघातामध्ये पत्नी ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाला आहे.
सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सांबरखल येथील शिक्षक सादुराम झुलूप ठाकरे (५५) पत्नी कमल सादुराम ठाकरे (५३) हे चांदवड तालुक्यातील मालगोंदे येथून निवडणुकीची सभा आटोपून सुरगाणा येथे परतत होते. वणी-सापुतारा मार्गावर खोरी फाटा येथे रस्त्याचे काम सुरू होते. त्यांची स्विप्ट डिझायर गाडी (क्रमांक एमएच १५ सीटी ८०४२) पुलाकरिता खोदलेल्या तीस फूट खोल खड्ड्यात आदळल्याने कमल ठाकरे व सादुराम ठाकरे या दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कमल ठाकरे यांना तपासून मृत घोषित केले. जखमी शिक्षकाला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सोबत असलेला तीन वर्षाचा नातू अनिरु द्ध प्रशांत ठाकरे याचा पाय मोडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पी.व्ही.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पी.के. जाधव अधिक तपास करीत आहेत.
ठाकरे दाम्पत्यास तीन मुले आहेत. थोरला मुलगा नोकरीस असून दुसरा रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.धाकट्या मुलाने शिक्षण शास्त्र पदविका अभ्यासक्र म पूर्ण केला आहे.  ठाकरे हे अतिदुर्गम भागातील मालगोंदे या गावातील रहिवासी असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. तर त्यांच्या पत्नीने मोलमजुरी करु न शिक्षण घेतले होते. त्यांनी जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.१ येथे काम केले आहे. तहसिलदार दादासाहेब गिते यांनी ठाकरे यांची चौकशी करु न चांदवड येथे निवडणूक कामी असलेल्या शिक्षकाला मदत मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला जाईल असे
सांगितले.

Web Title: Accident at Khari Phata; Teacher serious, wife killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.