नाशिक-पेठ रस्त्यावर अपघात; सात जखमी

By admin | Published: November 4, 2015 11:30 PM2015-11-04T23:30:53+5:302015-11-04T23:31:23+5:30

नाशिक-पेठ रस्त्यावर अपघात; सात जखमी

Accident on Nashik-Peth Road; Seven injured | नाशिक-पेठ रस्त्यावर अपघात; सात जखमी

नाशिक-पेठ रस्त्यावर अपघात; सात जखमी

Next

 दिंडोरी : नाशिक-पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात इंडिका कार व मॅक्स जीपचा एका वळणावर अपघात होऊन सात जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पेठच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे एन.आर.एस. पथक इंडिका कारमधून (क्र. एमएच १५ बीडब्ल्यू ५७९७) नाशिककडे जात असताना नाशिकहून येणारी मॅक्स जीप (क्र. एमएच २० एजी ८८१३) व इंडिका कार यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पेठ रु ग्णालयातील राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन अहिरे यांच्यासह त्यांचे सहकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. मॅक्स जीपचालक दत्तात्रय गणपत चिडे यांना किरकोळ दुखापत झाली. ग्रामस्थांनी जखमींना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी रवाना करण्यात आले असून, जखमींची नावे कळू शकलेली
नाहीत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. नाशिक-पेठ ररत्यावर अनेक अपघाती वळणे असून, सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे सदर वळणरस्ते दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Accident on Nashik-Peth Road; Seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.