नाशिक-पुणे महामार्गावर अपघात; कारच्या धडकेत मालवाहू चारचाकी पलटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 05:08 PM2023-07-11T17:08:50+5:302023-07-11T17:09:36+5:30
चालचाकी मालवाहू वाहन एमएच १५ जीव्ही २०४२ घेऊन चालक तुषार बागुल मंगळवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक रोडकडून सिन्नरच्या दिशेने जात होते
मनोज मालपाणी
नाशिकरोड : नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील बंगाली बाबा दर्गासमोर चारचाकी कार ओव्हरटेक करीत असताना कारने दुसऱ्या मालवाहू चारचाकी वाहनाला धडक दिल्याने मालवाहू वाहन उलटून अपघातात झाला, सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र दोन्हीही वाहनांचे नुकसान झाले आहे.
चालचाकी मालवाहू वाहन एमएच १५ जीव्ही २०४२ घेऊन चालक तुषार बागुल मंगळवारी (दि.११) दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिक रोडकडून सिन्नरच्या दिशेने जात होते. यावेळी शिंदे गाव, बंगाली बाबा दर्गासमोर पाठीमागून आलेल्या चारचाकी कार आय ट्वेन्टी (एमएच १५ ईपी ०३०६) ही मालवाहू वाहनाला ओव्हरटेक करीत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कराने मालवाहू वाहनाला धडक दिली. या अपघातात मालवाहू चारचाकी वाहन उलटून झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघातातील चारचाकी कार ही सिन्नरच्या एका डॉक्टरांची असल्याचे समजते. ही कार अपघातानंतर तत्काळ क्रेनच्या साह्याने हलविण्यात आली. तर मालवाहू चारचाकी वाहन बराच वेळ घटनस्थळी पडून असल्याने अपघातानंतर घटनास्थळी येणारे जाणारे वाहनधारकांची गर्दी झाली होती.