पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:43 PM2019-10-14T22:43:17+5:302019-10-15T00:56:18+5:30

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकअभावी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच जीवितहानीच्या घटनाही वाढल्या आहेत.

Accident on Pathardi road increased | पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ

पाथर्डी रस्त्यावर अपघातात वाढ

googlenewsNext

इंदिरानगर : पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजकअभावी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच जीवितहानीच्या घटनाही वाढल्या आहेत.
मुंबई-आग्रा महामार्ग, देवळाली कॅम्प वडनेरगेट पाथर्डीगाव यांसह विविध गावांतून शहरात ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच या रस्त्यास अनेक दिवसांपासून दुभाजकाची मागणी करूनही अद्यापही न टाकण्यात न आल्याने लहान-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच जीवितहानीची घटनाही वाढत चालले आहे. या रस्त्यावर बेफाम वेगाने वाहने धावत असल्याने नेहमीच लहान-मोठे अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव या रस्त्यादरम्यान व कडवेनगरसमोर अशी अपघाताचे ठिकाण झाली आहेत. या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानीच्या घटनामध्ये वाढ होत आहे.

Web Title: Accident on Pathardi road increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.