गाईना भुलीचे इंजक्शन देणाऱ्या सराईतांच्या वाहनाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:17 PM2020-10-27T20:17:59+5:302020-10-28T01:21:41+5:30
वणी : गाईना बेशुद्धीचे इंजक्शन देऊन गायीना वाहनात टाकुण अपहरण करण्याचा प्रयत्न जागृत युवकांनी हाणुन पाडलाअसुन सिनेस्टाईल पद्धतीने फरार होणार्या संशयीताच्या वाहनाचा अपघात झाला व संशयीत घटनास्थळावरुन फरार झाले
वणी : गाईना बेशुद्धीचे इंजक्शन देऊन गायीना वाहनात टाकुण अपहरण करण्याचा प्रयत्न जागृत युवकांनी हाणुन पाडलाअसुन सिनेस्टाईल पद्धतीने फरार होणार्या संशयीताच्या वाहनाचा अपघात झाला व संशयीत घटनास्थळावरुन फरार झाले.
सोमवारी मध्यरात्री नंतर सुमारे एक वाजेच्या दरम्यान काळ्या रंगाचे वाहन संशयास्पद स्थितीत वणी दिंडोरी रस्त्यावरील संखेश्वर मंदिर परिसरात फिरत असल्याची बाब राजेन्द्र चौधरी व सुरेश जावरे यांच्या निदर्शनास आली. ही माहीती त्यांनी गोरक्षणाचे काम करणार्या मंगेश दायमा यांना भ्रमणध्वनीवरुन सांगितली.
तदनंतर पोलीसांशी संपर्क साधुन ही माहीती कळविण्यात आली गृहरक्षक दलाचे जवान व पोलीसांचे पथक व मंगेश दायमा , राजेन्द्र चौधरी, सुरेश जावरे , अशोक शर्मा यांनी खाझागी कारने मार्गक्रमण करत या संशयीत वाहनाचा शोध घेतला असता सदर वाहन संखेश्वर मंदिर लगतच्या परिसरात असल्याचे दिसुन आले सदर वाहन अडवुन चौकशी केली तर बिंग फुटेल या भितीपोटो सशयीताने हे वाहन अनियंत्रित पद्धतीने दामटले वणी बसास्थानक परिसराबाहेर रस्त्याचे काम सुरु आहे त्या ठिकाणी रात्री रस्त्याचे काम करत असताना त्यांची तमा न बाळगता सदर वाहन वेगात तेथुन नेले मात्र त्या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी मशिन आणले होते त्या मशिनलला वाहन धडकल्याने काही अंतरावर जाऊन या वाहनाने तेथील टपरीला धडक दिली या सर्व द्राविडी प्राणायमात त्या वाहनाचे टायर फुटले व वाहन नादुरस्त झाले व त्यातील संशयीत फरार झाले वाहन दुरुस्त करुन पोलीस ठाण्यात ते जमा करण्यात आले.
सदर वाहनाचा मालक जळगाव येथील नासिर शेख असल्याची माहीती पुढे आली.दरम्यान संखेश्वर मंदीराच्या लगतच्या कॉलनीत दोन गायी विद्युत वितरण कंपनीच्या शेजारील भागात दोन गायी व एक गोर्हा अशा गुरांना बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देण्यात आल्याचे समजले या गुरांवर पाणी शिंपडुन त्यांना पाणी पाजुन शुद्धीत आणण्यात आले व त्यांचे बरेवाईट होण्यापासुन त्यांना वाचविण्यासाठी जागृत युवकांनी घेतलेली मेहनतीला यश आले.
संशयीत वाहनांमधे इंजेक्शनस व गुटख्याची पुडी आढळुन आली असुन रात्री अपरात्री सक्रिय होत असलेल्याअसमाजीक तत्वांचा बंदोबस्त करण्यासाठी गस्तीपथक कार्यान्वित करणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.