शिर्डी रस्त्यावर अपघात; पाच साईभक्त ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 01:46 AM2018-11-11T01:46:07+5:302018-11-11T01:46:27+5:30

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्रोल पंपासमोर शनिवारी (दि. १०) सायंकाळी हा भीषण अपघात झाला.

 Accident on Shirdi road; Five Sai Baba killed | शिर्डी रस्त्यावर अपघात; पाच साईभक्त ठार

शिर्डी रस्त्यावर अपघात; पाच साईभक्त ठार

googlenewsNext

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्रोल पंपासमोर शनिवारी (दि. १०) सायंकाळी हा भीषण अपघात झाला.  शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या साईभक्तांच्या इनोव्हाला (एमएच ०४ जेबी ७०९०) समोरून भरधाव येणाºया इंदाणी ट्रॅव्हल्सच्या आराम बसने (एनएल ०१ बी १०७०) धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. त्यात तीन जण जागीच ठार झाले. त्यामध्ये उदय वरळ व अकबल चकरमाकोल (वय अंदाजे ४५) रा. मुंबई तसेच नीलेश दशरथ जोशी (४५) रा. कांदिवली यांचा समावेश आहे. तिघा बालकांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यातील दोघांचा रस्त्यातच मृत्यू झाला. पवनराज जोशी (१२) आणि ऋषी वराळे (१३) अशी त्यांची नावे आहेत. पवनी जोशी ही तेरावर्षीय बालिका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील तिघांचे मृतदेह सिन्नरच्या रुग्णालयात आणण्यात आले होते.
वाहतूक कोंडी />अपघातानंतर सिन्नर-शिर्डी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची
खबर मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार संदीप शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. इनोव्हामध्ये अडकून पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले होते.

Web Title:  Accident on Shirdi road; Five Sai Baba killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.