जेजुरीला जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या टेम्पोला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 22:42 IST2022-03-14T22:41:35+5:302022-03-14T22:42:08+5:30
घारगाव : जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील भाविकांच्या टेम्पोचा अपघात होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि.१४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

जेजुरीला जाणाऱ्या नाशिकच्या भाविकांच्या टेम्पोला अपघात
घारगाव : जेजुरीला देवदर्शनासाठी जात असलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील भाविकांच्या टेम्पोचा अपघात होऊन एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर अन्य सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात सोमवारी (दि.१४) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.
वैभव योगेश गिरी (वय २५), आकाश दत्ता खोडे (वय २१), पूजा दत्तात्रय खोडे (वय २३), प्रिया शरद आंबेकर (वय २३), चेतन गणेश शिंदे (वय १०), ताराबाई दत्तात्रय खोडे (वय ३५) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर उपचारादरम्यान जनाबाई पुंडलिक खोडे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. हे सर्व जण नाशिक शहरातील पंचवटी येथील रहिवासी आहेत. पंचवटी येथील भाविक पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी टेम्पोने (क्रमांक एम.एच.१५, जी. व्ही. ५३२८) जात होते.
दरम्यान, ते पहाटे संगमनेर तालुक्यातील बोटा (माळवाडी) परिसरात आले असता टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
फोटो- १४ घारगाव ॲक्सिडेंट