ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:13 PM2020-12-18T16:13:55+5:302020-12-18T16:14:26+5:30

ट्रॉली उलटली : सुदैवाने जीवितहानी टळली

Accident to a tractor transporting sugarcane | ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात

googlenewsNext
ठळक मुद्देगळीत हंगाम सुरू झाल्यावर अपघातांचे प्रमाण वाढून अनेकांना आपले जीव गमवावे लागले


पिंपळगाव बसवंत : ऊस वाहतूक करणारा डबल ट्रॉली असलेला ट्रॅक्टर पिंपळगाव बसवंत परिसरातील रानमळा येथे गुरुवारी (दि.१७) मध्यरात्री अपघात होऊन उलटला. सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
गळीत हंगाम सुरू झाल्यावर अपघातांचे प्रमाण वाढून अनेकांना आपले जीव गमवावे लागले तरीदेखील बेकायदेशीर होणाऱ्या ऊस वाहतुकीकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. ऊसाच्या वाहतुकीनुसार ट्रॅक्टरमालकाला कारखान्याकडून भाडे अदा करण्यात येते. यामुळे ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरच्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. यासाठी सर्रास दोन ट्रॉलींचा वापर करण्यात येतो. एका ट्रॉलीची क्षमता १४ते १५ टन इतकी असते; परंतु यामध्ये १८ ते २० टन ऊस भरण्यात येतो. नफा कमाविण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. सर्रास विनापासिंग ट्रॉलींचा वापर करण्यात येतो व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातास प्रामुख्याने ट्रॉली कारणीभूत ठरतात. त्यांना इंडिकेटरदेखील नसतो, शिवाय रिफ्लेक्टरदेखील वापरण्यात येत नाही. केवळ एका लाईटच्या जोरावर ट्रॅक्टरचालक बेफाम ट्रॅक्टर दामटत असतात. त्यातून अपघात घडून अनेकांचे बळी जातात. अशा वाहतुकीला अभय देऊन एकप्रकारे ग्रामीण भागातील रस्त्यावरील सुरक्षा वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Accident to a tractor transporting sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.