चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:40 PM2020-07-14T20:40:26+5:302020-07-15T01:15:31+5:30
सुरगाणा : चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाºया ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) घडली. तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रक क्र . सी.जी. ०७ बीके ७१४४ बुबळी जवळील चिराई घाटातील यू टर्न वळणावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास उलटला.
सुरगाणा : चिराई घाटात रेशनची वाहतूक करणाºया ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४)
घडली. तालुक्यात रेशनच्या धान्याची वाहतूक करणाºया ट्रक क्र . सी.जी. ०७ बीके ७१४४ बुबळी जवळील चिराई घाटातील यू टर्न वळणावर दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास उलटला. पावसाची रिपरिप सुरु असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला मातीच्या ढीगावर धडकल्याने ट्रकला अपघात झाला. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने चालक यशवंत कुमार राजकुमार
धुरु रा.सामोरा ता. बागबहास जि. महासमुंद (छत्तीससगढ) हा किरकोळ जखमी झाला असून त्याच्या पायाला, हाताला दु:खापत झाली आहे. अपघातात ट्रकची पुढील चाके जागेवर निखळून पडली असून चालकाच्या कॅबीनचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पुरवठा अधिकारी उल्हास टर्ले यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर नांद्रे यांना या घटनेची माहिती देत चिराई घाटात धाव घेतली. चालकास ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाऊस सुरु असल्याने ट्रकमधील धान्य झाकण्याकरीता गोदामातून ताडपत्रींची व्यवस्था करण्यात आली असुन रेशनचा गहू व तांदूळ याची वाहतूक दुसºया ट्रकद्वारे करण्यात आली.
--------------------------
रेशन वाहतूक करणाºया ट्रकचा चिराई घाटात अपघात झाल्याची माहिती समजताच घटनास्थळी जावून धान्य पावसात भिजणार नाही याची काळजी घेतली आहे. ट्रकमध्ये तीस टन माल भरलेला होता. अंदाजे दहा ते बारा क्विंटल धान्य पावसात भिजून खराब झाले आहे. खराब झालेले धान्य ठेकेदारास परत करण्यात येईल.
-उल्हास टर्ले, तालुका पुरवठा अधिकारी