गतिरोधकावरच होताय अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 06:58 PM2019-06-12T18:58:29+5:302019-06-12T19:03:39+5:30
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जळगाव नेऊर पुरणगाव, देशमाने या ठिकाणी असलेल्या गतीरोधकावर अपघाताची मालिका सुरू असुन महामार्गाची दुरु स्ती करतांना या ठिकाणी असलेले छोटे छोटे गतिरोधक काढून त्याठिकाणी मोठे गतिरोधक केल्याने जळगाव नेऊर, पुरणगाव, देशमाने येथील गतिरोधकावर दोन दिवसात अनेक अपघात होऊन अनेक वाहनचालक जख्मी होऊन अपंगत्व आले आहे.

येथील जंगली महाराज आश्रमाजवळील गतिरोधकावर जळगाव नेऊर येथील गणेश ठोंबरे या युवकाचा अपघात होऊन नाशिक येथील सोपान हॉस्पिटलला उपचार घेत आहे तर शिरसगाव लौकी येथील योगेश बुल्हे व देशमाने येथील गोसावी यांच्या वर जळगाव नेऊर येथील खासगी रु ग्णालयात प्राथमिक उपचार केले यात एका मिहलेचाही, समावेश आहे,सदर महामार्गाची डागडुजी करताना ठेकेदाराने या गतिरोधकावर सफेद साईडपट्या न मारल्याने गतिरोधक समजत नाही, त्यामुळे अनेक वाहने अपघाताला बळी पडत आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन सफेद साईडपट्या मारु न गतिरोधकाची उंची कमी करावी अशी मागणी होत आहे. येत्या दोन दिवसात या गतिरोधकावर सफेद साईड पट्या न मारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा तरु णांनी दिला आहे.