अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:39 PM2020-02-08T22:39:33+5:302020-02-09T00:28:48+5:30

सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत. सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासह अन्य तयारी झाली पूर्ण झाली आहे. या महामार्गासाठी चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करताना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कडे लक्ष देण्याची गरज आहे.

Accidental area became a death trap for consumers | अपघातप्रवणक्षेत्र बनले साईभक्तांसाठी मृत्यूचा सापळा

सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाट्याजवळ वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी वावी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन उभे करून त्याच्या बाजूला वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी लावलेला फलक.

Next
ठळक मुद्देसिन्नर-शिर्डी महामार्ग । अपघात टाळण्यासाठी चौपदरीकरणाच्या कामात काळजी घेण्याची गरज

शैलेश कर्पे ।
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर गेल्या दोन वर्षात शंभराहून अधिक साईभक्तांसह प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर ते शिर्डी या सुमारे ६० किलोमीटर अंतराच्या महामार्गावर वेडीवाकडी वळणे व अपघातप्रवणक्षेत्र साईभक्त व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनले आहेत.
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करण्यासह अन्य तयारी झाली पूर्ण झाली आहे. या महामार्गासाठी चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ करताना सिन्नर-शिर्डी महामार्गावरील ‘ब्लॅक स्पॉट’ कडे लक्ष देण्याची गरज आहे.

आजपर्यंत शेकडो साईभक्त प्रवाशांना शिर्डीला जाताना किंवा येतांना प्राण गमवावे लागले असून, शेकडोजणांना अपघातात अपंगत्व आले आहे. त्यामुळे या महामार्गावरील वळणे पूर्णपणे काढून टाकण्यासह अपघातप्रवणक्षेत्रावर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत्या अपघातामुळे सिन्नर-शिर्डी रस्ता चर्चेत आला होता. त्यामुळे या रस्त्याचे सात वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले होते, मात्र त्यानंतरही अपघाताचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढले होते. वाढती वाहनांची संख्या व वेग यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अपघातात मृत्युमुखी व जायबंदी होण्याचे प्रमाण वाढल्याने चौपदरीकरणात अपघात टाळण्यासाठी आतपासूनच काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

५१ किलोमीटरचा रस्ता होणार चौपदरी
सिन्नर-शिर्डी महामार्गापैकी ५१ किलोमीटर रस्ता चौपदरी होणार आहे. यासाठी एजन्सीला काम देण्यात आले आहे. ठेकेदाराने कामास काही प्रमाणात प्रारंभ केला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या कामासाठी गेल्यावर्षीच ७८२ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा महामार्ग नाशिक व अहमदनगर या दोन महामार्गांना जोडणारा आहे. चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासह सिन्नरहून शिर्डीला सुमारे ४५ मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे. या चौपदरीकरणामुळे अपघाताची संख्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

साई पदयात्रेकरुंसाठी स्वतंत्र पालखी मार्गाची गरज
मुंबई, दादर, ठाणे, कल्याण या महानगरांसह त्यांच्या उपनगरातून व नाशिक व गुजरात राज्यातून दरवर्षी शेकडो पालख्यांसह हजारों साईभक्त शिर्डीला पायी येत असतात. शिर्डीला पायी जाताना सिन्नर-शिर्डी महामार्गावर आतापर्यंत अनेक पदयात्रेकरुंना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे किंवा अपंगत्वही आले आहे. त्यामुळे पायी दिंडीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग असावा अशी अनेक दिवसांपासून मागणी आहे. त्यादृष्टीने काही प्रयत्नही झाले होते. सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरण करताना पायी पालखी मार्गाचा विचार होण्याची गरज आहे.

अपघात टाळण्यासाठी वावी पोलिसांकडून प्रबोधन
सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वावी पोलिसांकडून प्रबोधन केले जाते. पायी पदयात्रेंकरुंनी उजव्या बाजूने चालावे असे फलक लावण्यासह विविध प्रबोधनात्मक फलकही लावण्यात आले होते, मात्र त्याचा फारसा उपयोग झाला
नाही. देवपूर फाटा व पांगरी शिवारातील ‘ब्लॅक स्पॉट’वर अपघातग्रस्त वाहने उभी
करुन ‘ज्यांना घाई .. ते निघून गेले’ अशा आशयाचे फलक लावून प्रबोधनही करण्यात
आले आहे. त्यानंतरही वाहनचालकांकडून आपल्या एक्सलेटरवरचा पाय कमी झालेला
दिसत नाही.

ही आहेत अपघातप्रवणक्षेत्र..
सिन्नर-शिर्डी या ६० किलोमीटर अंतरात अनेक अपघातप्रवणक्षेत्र आहेत. याठिकाणी नेहमी अपघात होऊन प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. सिन्नरपासून निघाल्यानंतर जुन्या केला कंपनीजवळ वळण, सामाजिक वनीकरणाच्या कार्यालयजवळ वळण, केदारपूर शिवारात आम्रपालीजवळ देवनदीजवळील वळण, खोपडी शिवारातील दत्तमंदिराजवळचा स्पॉट, देवपूर फाटा, पांगरी शिवारातील बाबाज् ढाब्याजवळील वळण, वावी ते पांगरीदरम्यान असलेली वळणे, पाथरे गावाजवळ नदीजवळ असलेले वळण, दर्डे शिवारात गोदावरील कालव्याजवळील वळण ही महत्त्वाची अपघातप्रवण क्षेत्र असून चौपदरीकरणात याठिकाणी अपघात टाळण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

Web Title: Accidental area became a death trap for consumers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.