वेगवेगळ्या घटनांत सहा लोकांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 12:59 AM2019-10-31T00:59:45+5:302019-10-31T01:00:02+5:30

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 Accidental death of six people in different incidents | वेगवेगळ्या घटनांत सहा लोकांचा अपघाती मृत्यू

वेगवेगळ्या घटनांत सहा लोकांचा अपघाती मृत्यू

Next

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघातीमृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाथर्डी फाटा येथील दामोदरनगर येथील किरण देवरे (३६) हे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून मृत्युमुखी पडले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
झोपेत असताना पलंगावरून खाली पडल्याने ६४ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना निलगिरी बाग परिसरात घडली. ब्रह्मदेव चिंधाजी सरदार असे या मयत वृद्धाचे नाव आहे. जेलरोड येथील एका बँकेसमोर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले रामकिसन नारायण कांगुणे (२४, रा. कॅनॉलरोड) या दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामकिसन हा त्याच्या दुचाकीने (एमएच १५, जीके ३६६६) बिटको चौकाकडे जात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
माडसांगवी येथील मानूर फाट्याजवळ एका पादचारी वृद्धाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.२८) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. जनार्दन बाळा शिंदे (६८) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. देवळाली कॅम्प येथील वडनेर रोडलगत असलेल्या लोखंडी खांबावर जाऊन रिक्षा आदळून झालेल्या अपघातात सचिन हरिदास सानप (३२, रा. संसरी गाव) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.२९) भाऊबीजेच्या दिवशी घडली.

Web Title:  Accidental death of six people in different incidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.