अस्तगाव येथील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:44 IST2020-12-12T23:50:45+5:302020-12-13T01:44:39+5:30

मनमाड: येथून जवळच असलेल्या अस्तगाव ता: नांदगाव येथील लष्करी जवान सुरेश घुगे यांचा जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Accidental death of a soldier at Astagaon | अस्तगाव येथील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

अस्तगाव येथील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू

ठळक मुद्देघुगे हे २००६ मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियनमध्ये कार्यरत

मनमाड: येथून जवळच असलेल्या अस्तगाव ता: नांदगाव येथील लष्करी जवान सुरेश घुगे यांचा जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यांच्या निधनाने वृत्त येताच मनमाडसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

घुगे हे २००६ मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर मराठा ई बटालियनमध्ये कार्यरत होते. रात्री डोंगरावर गस्त घालत असताना पाय घसरून ते खाली पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि ९ वर्षांची मुलगी आहे. सदर घटनेमुळे अस्तगाव गावावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे मोठा मित्र परिवार असलेल्या घुगे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घुगे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी तालुक्यातील नागरिकांनी अस्तगाव येथे गर्दी केली होती. घुगे यांच्यावर मूळ गावी अस्तगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Accidental death of a soldier at Astagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.