पाथरे येथे कामगाराचा अपघाती मृत्यू
By Namdeo Kumbhar | Updated: October 12, 2019 15:13 IST2019-10-12T15:12:48+5:302019-10-12T15:13:58+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाथरे येथे मुसळगाव एमआयडीसी येथील रिंग गिअर कंपनीतील कामगाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.

पाथरे येथे कामगाराचा अपघाती मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील पाथरे येथे मुसळगाव एमआयडीसी येथील रिंग गिअर कंपनीतील कामगाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. सुनील माधव दवंगे (४७) हे वावी पाथरे रस्तावरुन पायी चालत होते. दवंगे यांना अज्ञान वाहनाने धडक दिली. त्यात ते रस्त्यातच्या बाजूला फेकले गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात जाण्यापूर्वीच रस्त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.