रस्त्यावरील कंटेनर्समुळे वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:19 AM2017-10-28T00:19:39+5:302017-10-28T00:19:45+5:30

झपाट्याने विकसित झालेल्या इंदिरानगर भोवतालच्या परिसरात आता वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांची डोकदुखी ठरली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागात असलेल्या सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळांची सोय नसल्याने त्यांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, व्यावसायिकांच्या सोयीमुळे नागरिकांची गैरसोय कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Accidents caused by road containers | रस्त्यावरील कंटेनर्समुळे वाढले अपघात

रस्त्यावरील कंटेनर्समुळे वाढले अपघात

Next

संजय शहाणे ।
नाशिकच्या विस्तारात सर्वाधिक फोफावलेला भाग असलेल्या इंदिरानगर, राजीवनगर, पाथर्डी आणि वडाळा रोड अशा विविध प्रकारांच्या मार्गांवर नव्या वसाहती झाल्या आहेत. मोठे-मोठे गृहनिर्माण प्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्याबरोबरच लोकांची गरज म्हणून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा असे सर्वच वाढत आहे. त्यामुळे हळूहळू परिसराच्या समस्यादेखील वाढत आहेत. विशेषत: वाहतुकीची समस्या वाढू लागली असून, त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यावर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...
इंदिरानगर : झपाट्याने विकसित झालेल्या इंदिरानगर भोवतालच्या परिसरात आता वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांची डोकदुखी ठरली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागात असलेल्या सीमेंट गुदामधारकांकडे वाहनतळांची सोय नसल्याने त्यांचे रस्त्यावर अतिक्रमण झाले असून, व्यावसायिकांच्या सोयीमुळे नागरिकांची गैरसोय कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.  कलानगर ते पाथर्डीगाव, वडाळा-पाथर्डी रस्त्याचे काम दीड वर्षभरापूर्वी करण्यात आले. केवळ रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणच नव्हे तर सुशोभिकरण करण्यात आले. त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, समर्थनगर, पांडवनगरी, कैलासनगरसह विविध उपनगरे आहेत. अंबड औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. तसेच रस्त्यालगतच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने दिवसभर शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांची वर्दळसुद्धा असते. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून अवजड वाहनास परवानगी नसतानाही सर्रासपणे दिवसभर सीमेंटच्या गोण्या घेऊन सुमारे चाळीस ते पन्नास चाकांच्या कंटेनर बेफान वेगाने ये-जा करीत असतात.  सराफनगरलगत सीमेंटच्या गोण्यांची गुदाम असल्याने दिवसभर गोण्या उतरवणे आणि सोडविण्यासाठी सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान कंटेनर तासनतास रांगा लावून उभ्या असतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी दुचाकी अथवा मोटारचालकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. रस्त्यात अडचणीत भर घालणाºया या कंटेनर्समुळे दिवसागणिक लहान-मोठे अपघात होत असतात. संबंधित विभाग अजून किती जीवितहानी होण्याची वाट बघणार आहे,  असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. (क्रमश:)
वाहनतळाची व्यवस्था नाही
परिसरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून हेल्मेट सक्तीच्या नावाने दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाते, परंतु रस्त्यावर तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरधारकांवर आणि अवजड वाहनांची वाहतूक करण्यावर शहर वाहतूक पोलीस विभाग कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच वाहनतळांची कोणतीही व्यवस्था नसतानाही सीमेंट गुदामधारकांना येथे व्यवसाय करण्यास परवानगी कशी मिळाली, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गाफील कंटेनरमुळे एक ठार
या परिसरात उभ्या असणाºया कंटेनरचालकाच्या चुकीमुळे त्याच्याच सहचालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. कंटेनर खाली सहचालक वामकुक्षी घेत असताना चालकाने कंटेनर चालू केला आणि त्याखाली सहचालकाचा मृत्यू झाला. इतके गाफील चालक असतील तर नागरिकांनी या भागात कसे वावरायचे, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आाहेत.

Web Title: Accidents caused by road containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.