राहुड घाटात अपघात; धुळ्याचे तीन ठार
By Admin | Published: December 27, 2016 12:59 AM2016-12-27T00:59:40+5:302016-12-27T01:09:11+5:30
पहाटेची घटना : पाच जण गंभीर जखमी; इनोव्हा चालकाविरोधात गुन्हा
चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर राहुड शिवारात आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास इनोव्हाने छोटा हत्तीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा रोडवर राहुड घाटात पवार वस्तीजवळ चांदवडकडून मालेगावकडे जाणारी गोल्डन रंगाची इनोव्हा (क्रमांक एमएच ०४ - ईएच ४५६७ ही भरधाव वेगाने चालवून रस्त्यावरु न पुढे जात असलेला टाटा छोटा हत्ती (क्र. एमएच १८-एए ५१७२ हिस मागुन घडक दिल्याने छोटा हत्तीमधील नाशिककडून केंटरींगचा व्यवसाय आटोपुन धुळे येथे जाणारे शांतीशरण राजाराम वर्मा (४७) , बबीता सुकलाल पाथरे (४५) हे जागीच ठार झाले. निर्मलाबाई प्रकाश मिस्तरी (४०) यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. छोटा हत्तीमधील विमल छगन अंकुश (३५), सुरेखा सुरेश बागुल (२५) , संगीता गजानन चौधरी ( ४०), वर्षा श्याम बागुल (२५) , लक्ष्मीबाई लहु सोनवणे ( ५४) सर्व रा.धुळे गंभीर जखमी झाले. इनोव्हा चालक सचिन शिवाजी मलीक रा. कल्याण यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती करीत
आहेत. (वार्ताहर) वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहीते , सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांना सोमा टोलवेज कंपनीच्या ग्रस्ती व रुग्णवाहीका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाली होती त्यांना बाजुला काढले व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली जखमी व मृतांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.