आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:24 AM2018-12-29T00:24:54+5:302018-12-29T00:25:18+5:30
अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
नाशिक : अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मनखेड येथे आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी निवासव्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेसह, प्रयोगशाळा, भोजनालय कक्ष, संगणक कक्ष, सौर ऊर्जा संच, अशा विविध वस्तूंच्या वाटप करण्याचा सोहळा खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलकाता येथील कृष्णतीर्थ आश्रमाचे महंत शिवानंद स्वामी उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांना विविध सोयी उपलब्ध व्हाव्यात याकरिता अखिल विश्व गायत्री परिवाराचे अमेरिकेतील भाविक धनसुख लोहार (नवसारीवाले) यांनी देणगी दिली आहे.
दरम्यान, गायत्री परिवाराच्या वतीने याप्रसंगी पाच कुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. परिव्राजक विनायक गिल्लोरकर, विद्या गिलोरकर, प्रतिभा नागरे, उषा राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर यज्ञ संपन्न झाला. यावेळी आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे नाशिक शहराध्यक्ष मनीभाई पटेल, अमृतभाई पटेल, जिल्हा समन्वयक मीनानाथ सोनवणे, हसमुखभाई पांडे, जयंतीभाई नाथी, नवनीतभाई पटेल, गुलाब रामावत, जयगोविंद पांडे, सयाजी गांगुर्डे, रवींद्र वाघ, नर्मदा पटेल, चंद्रीका नाथी, इरावती पांडे, कलावती चव्हाण, मुख्याध्यापक मनीयार, रमेश थोरात आदी उपस्थित होते.
अखिल विश्व गायत्री परिवार हरिद्वार शाखा नाशिक यांच्या विद्यमाने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधेसाठी निवास व्यवस्था करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून गायत्री परिवाराचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे.