ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:03 PM2019-05-19T16:03:24+5:302019-05-19T16:05:58+5:30

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल ...

According to astrology, Modi is far from the very best | ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

ज्योतिषशास्त्रानुसार भाजपा बहुमतापासून दूर तरीही मोदीच पंतप्रधान

Next
ठळक मुद्देभविष्यवाणी : महाराष्ट्रात युतीला फटका बसण्याचा दावा

नाशिक : लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपाला २०१४ प्रमाणे बहुमत मिळणार नसले तरी भाजपा हाच देशातील सर्वांत मोठा पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी पुणे येथील ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात  राष्टवादीचे ग्रह अनुकूल असल्याने राष्ट्रवादीच्या जागांमध्ये वाढ होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.
देशांतर्गत निवडणुका, देशावरील संकटे तसेच क्रिकेट खेळाचे भविष्य वर्तविणारे ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी नाशिकधील ज्योतिष परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात अनेक दावे केले आहेत. गुरूच्या स्थानामुळे मोदी यांना लाभ होणार असून गेल्या काही महिन्यात त्यांच्यासंदर्भात घडलेल्या घटना त्यांच्यासाठी अनुकूल ठरल्याचा दावादेखील मारटकर यांनी केला आहे. राहुल आणि प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रभाव वाढत असून यंदा नव्हे तर पुढच्या काळात २०१९ नंतर त्यांना अनुकूल काळ असल्याचेही त्यांनी भाकीत वर्तविले.
महाराष्ट्रात   उद्धव ठाकरे यांना फटका बसणार असल्याचे सांगताना राष्टÑवादीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचे दोघांचे ग्रह सांगतात असे मारटकर म्हणाले. राष्टÑवादाच्या कामगिरीचा लाभ आघाडीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगतात. नगरमध्ये सुजय विखे यांचा विजय सहज असेल असे भाकीत त्यांनी वर्तविले. राधाकृष्ण विखे-पाटील विधानसभेत महत्त्वपूर्ण भूमिका राहिले, असाही दावा त्यांनी केला.

 

Web Title: According to astrology, Modi is far from the very best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.