हजारे यांच्या आकलनानुसार प्रश्न सुटणे अशक्य : देसरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 01:07 AM2018-03-31T01:07:26+5:302018-03-31T01:07:26+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे.
नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल मंजुरीसाठी पुन्हा केलेले आंदोलन यशस्वी झाले नाही. त्याचे कारण लोकपाल हा व्यवस्थेला सर्वोच्च ठरू शकत नाहीत. त्यातच विसाव्या शतकातील आडाख्यानुसार एकविसाव्या शतकात प्रश्न कसे सुटणार, असा थेट प्रश्न अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी उपस्थित केला आहे. वसुंधरा बचाव, मानव बचाव व किसान बचावसाठी आयोजित संवाद यात्रेंतर्गत देसरडा नाशिक दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुपारी पत्रकार परिषदेत सदरचे मत व्यक्त गेले. अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले आंदोलन संपल्यानंतर त्यावर टीका होत असून, त्यासंदर्भात प्रश्नांना उत्तर देताना काळानुसार प्रश्नांची समस्यांकडे बघणे आणि त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्यात हजारे यांचे आकलन कमी पडत असल्याचेही देसरडा म्हणाले. महाराष्ट दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळाचे कार्याध्यक्ष असलेल्या देसरडा यांनी २०१४ साली केंद्रात आणि त्यापाठोपाठ राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शेतकरी, आदिवासी आणि असंघटित क्षेत्रातील समस्या सुटण्याची मोठी अपेक्षा होती. परंतु मोदी आणि फडणवीस यांनी दिलेली आश्वासनांची पूर्ती न केल्याने गत चार वर्षांत चार हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या सरकारने शेतकरी, आदिवासी आणि अन्य कष्टकºयांची आंदोलने केवळ आश्वासने देऊन गारद करण्यात आली आहेत, असे सांगून देसरडा यांनी देशातील विकासाची संकल्पना बदलायला हवी, विशेषत: लोकसहभाग असलेली पर्यावरण-पूरक विकासाची संकल्पना राबविली तरच सर्व घटकांचा विकास शक्य आहे, असेही ते म्हणाले.