कारखानदार एफआरपीनुसार उसाला भाव देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:26 AM2017-11-30T00:26:04+5:302017-11-30T00:30:41+5:30
नाशिक : साखरेचे भाव पडल्यामुळे तसेच कारखान्यांसमोर अडचणी असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणेच उसाला भाव देण्यास तयार आहेत, असे बुधवारी (दि. २९) जिल्ह्यात सुरू असलेल्या चारही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले.
नाशिक : साखरेचे भाव पडल्यामुळे तसेच कारखान्यांसमोर अडचणी असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणेच उसाला भाव देण्यास तयार आहेत, असे बुधवारी (दि. २९) जिल्ह्यात सुरू असलेल्या चारही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले. तसेच कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस गाळपानंतर सरकारने ठरवून दिलेल्या ७०:३० या सूत्राप्रमाणे भाव देण्याचीही तयारी दर्शविली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याबाबत सहमती दर्शविल्यामुळे ऊस भावाबाबतचे शेतकरी संघटनेचे आंदोलन टळल्याची चर्चा आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जुन्या मुंबई-आग्रा मार्गावरील सभागृहात बुधवारी साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीस कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, द्वारकाधीशचे अध्यक्ष शंकरराव सावंत, वसाकाचे प्रतिनिधी अण्णा पाटील, केजीएसचे प्रतिनिधी
तसेच शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, विशेष लेखापरीक्षक देशमुख, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे उपस्थित होते. द्वारकाधीशचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी, आम्ही (पान ५ वर)
एफआरपीपेक्षा अधिक भावाची घोषणा केली असून, पहिली उचल २४०० रु पये, तसेच दिवाळीत १०० रु पये व सरकारच्या एफआरपीप्रमाणे भाव देण्याची तयारी असल्याचे तसेच यापेक्षा अधिक भाव दिल्यास सहकारी साखर कारखानदारी बुडविल्याचा आरोप घेण्याची तयारी नसल्याचेही त्यांनी सांगितले. केजीएसच्या प्रतिनिधींनी द्वारकाधीशप्रमाणेच भाव देण्याची तयारी दर्शविली. वसाकाच्या प्रतिनिधींनी द्वारकाधीश कारखान्याप्रमाणेच भाव देण्याचे आमचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी २६०० रु पये पहिली उचल देण्याची मागणी केली; परंतु कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हे शक्य नसल्याचे सांगून त्यांची मागणी टाळली.श्रीराम शेटे यांनी साखर कारखानदारी कशी तोट्यात आहे याबाबत मांडणी केली. अशा परिस्थितीत कादवा एफआरपीप्रमाणे २२८५ भाव देण्यास तयार आहे. त्यानंतर ७०:३० या सूत्राप्रमाणे जी रक्कम येईल तीही दिली जाईल, असे स्पष्ट केले.