सातवा वेतन आयोग नुसार आम्हालाही वेतनवाढ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 03:49 PM2018-10-14T15:49:34+5:302018-10-14T15:50:24+5:30
सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
सुरगाणा : समान काम समान वेतन या ध्येय धोरणानुसार सातवा वेतन आयोग नुसार आम्हांला देखील वेतनवाढ या दिवाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करण्याची मागणी तालुक्यातील अनुदानित वसतिगृहातील कर्मचाºयांनी केली असून त्यासंदर्भात लेखी पत्र मुख्यमंत्री यांना पाठवले आहे.
सद्यस्थितीत महागाई वाढली आहे. अशा परिस्थितीत अधिक्षक आठ हजार रु पये, स्वयंपाकी सहा हजार रु पये, चौकीदार व मदतनीस यांना पाच हजार रु पये या स्वरु पात तुटपुंजे मासिक मानधन मिळत आहे. कुटूंबाचा उदरिनर्वाह भागविण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आघाडीचे शासन असतांना डिसेंबर २०१३ मध्ये सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे यांनी पंधरा दिवसात सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील अधिवेशनात काळात शिष्ठमंडळाने भेट चर्चा केली होती. त्यांनीही वसतिगृह कर्मचारींचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही कर्मचारींच्या शिष्ठमंडळाने भेट घेतली. त्यांना आण िसामाजिक मंत्री राजकुमार बडोले यानाही निवेदन दिले. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र सर्वांनी दिलेले आश्वासन हवेत विरले असून कर्मचाºयांना उदरनिर्वाह करतांना नाकीनऊ आले आहे.सामाजिक न्याय विभाग या दिवाळीला शासकीय वसतिगृह व आश्रमशाळा यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे. मग आम्हालाच का नाही, असा सवाल उपस्थित केला असून आठ हजार एकशे चार कुटुंबाकडून सातवा वेतन आयोग येत्या दिवाळीत लागू करण्याची मागणी केली आहे. या कर्मचारींनी वेतनश्रेणी कृतिसमिती स्थापन केली असून याबाबत येथील आमदार जे.पी.गावित, तहसीलदार दादासाहेब गिते यांचेसह अन्य लोकप्रतिनिधी यांनाही कर्मचारी महेंद्र पगार, विठ्ठल चौधरी, फकिरा निकम, भाऊसाहेब घांगळे, फुलसिंग गायकवाड, मंगला गावित, विमल धूम, आनंदा गवळी, अरु ण जाधव, नारायण भडांगे, रघुनाथ खंबाईत, योगिता गवळी, जयंदा टोपले, बायजा गावित, रामदास गावित, पारी गावित, मनिषा वाघ, सखाराम गावित, विठ्ठल भोये, अम्रुता गवळी, प्रकाश भोये, मधुकर वाघमारे आदी निवेदन दिले आहे.