समको माजी संचालकांकडून पक्षपातीपणाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:34 AM2019-02-06T00:34:03+5:302019-02-06T00:34:26+5:30
नाशिक : सटाणा मर्चंट सहकारी बँकेच्या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या अपिलात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप बँकेचे माजी संचालक विठ्ठल येवलेकर आणि विजय भांगडिया यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. समको बँकेच्या तीन संचालकांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून दाखल केलेले अपील निकाली काढण्यापूर्वी तज्ज्ञांकडून स्वाक्षरीची तपासणी न करता विभागीय सहनिबंधकांनी दीड महिन्यात जवळपास १४ ते १५ वेळा सुनावणी घेऊन या प्रकरणाचा एकतर्फी निपटारा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून, या प्रकरणी दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी १३ फेब्रुवारीला घंटानाद आंदोलन करण्याचा इशाराही आरोपकर्त्यांनी दिला आहे.

विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे कोरम पूर्ततेसाठी दाखल केलेल्या अपिलावर तज्ज्ञ संचालक गौरव जैन, विक्रम मेहता व शरद सोनवणे यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली. त्याविषयी या संचालकांनी विभागीय सहनिबंधकांकडे लेखी हरकत घेतली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून विभागीय सहनिबंधकांनी दीड महिन्यात १४ ते १५ सुनावण्या घेऊन ही फाईल निर्णयासाठी बंद केली. या कालावधीत वारंवार विनवणी करूनही बाजू मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला नाही. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले नाही आणि बनावट स्वाक्षºयांच्या आधारे हे अपील निकाली काढण्याचा घाट घातला गेल्याचा आरोप डॉ. विठ्ठल येवलेकर व विजय भांगडिया यांनी केला आहे. या प्रकरणी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज अमृतकर, यशवंत येवला आदी माजी संचालकही उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी, आपण दोन्ही पक्षांना बाजू मांडण्याची समान संधी दिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर अधिक बोलणे संयुक्तिक ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. बॅँकेवर प्रशासकाची नियुक्ती
कळवण, मालेगाव, सटाणा पट्ट्यातील स्थानिक बँकांमध्ये अग्रस्थानी असलेल्या समको बँकेत १७ संचालकांचे कार्यकारी मंडळ आहे. परंतु, यापैकी विविध कारणांनी सहा संचालक अपात्र ठरल्यानंतर बँकेच्या उपाध्यक्षांसह तीन संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कोरमअभावी बँक बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आला.