कामाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:13 AM2018-10-12T01:13:44+5:302018-10-12T01:16:07+5:30
कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच वडनेर खाकुर्डी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा दावा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना आणि मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. वरिष्ठांच्या जाचक कामकाजाच्या पद्धतीमुळेच कर्मचारी दबावात काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनेदेखील केला असून, याप्रकरणी सोमवारी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान गुरुवारी आरोग्य कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.
नाशिक : कामाचा अतिरिक्त ताण आणि वरिष्ठांच्या दबावामुळेच वडनेर खाकुर्डी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा दावा आरोग्य सेवक कर्मचारी संघटना आणि मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. वरिष्ठांच्या जाचक कामकाजाच्या पद्धतीमुळेच कर्मचारी दबावात काम करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेनेदेखील केला असून, याप्रकरणी सोमवारी आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान गुरुवारी आरोग्य कर्मचाºयांनी काळ्याफिती लावून निषेध नोंदविला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्य सेवक कौतिक बाबूराव अहिरे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या कामाच्या तणावामुळे कौतिक अहिरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. अहिरे यांच्याकडे वडनरे येथील आरोग्य केंद्राबरोबरच अन्य दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांचादेखील पदभार होता. शिवाय जिल्हा परिषदेकडून वारंवर आढावा, कामाचे टार्गेट तसेच कारणे दाखवा नोटीस बजविली जात असल्याने आणि सातत्याने मार्चचे टार्गेट हे डिसेंबरमध्येच पूर्ण करण्याचा तगादा लावण्यात आल्यामुळे अहिरे तणावात असल्याचा दावा कुटुंबीय आणि आरोग्य सेवक संघटनेने केला आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवकांवर सध्या कामाचा मोठा ताण असून, डिसेंबरमध्येच टार्गेट पूर्ण करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याच कारणातून जिल्हा परिषदेने तीन कर्मचाºयांवर निलंबनाचीदेखील कारवाई केली आहे. वास्तविक या कर्मचाºयांचे कामकाज ७० ते ८० टक्क्यांच्यापुढे असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सातत्याने माहिती मागणे, आॅनलाइन माहितीची विचारणा करणे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या मीटिंग तसेच अधिकाºयांकडूनदेखील मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नावाने धमकी दिली जात असल्याचा आरोप संघटनेकडून होत आहे. केवळ टार्गेट पूर्ण करून विभागात राज्यात आपल्याच कामाचे कौतुक होण्यासाठी कर्मचाºयांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आरोग्यदेखील कर्मचारी संघटनेने केला आहे.
याप्रकरणी आता संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून, निलंबित तीनही कर्मचाºयांवरील निलंबन मागे घ्यावे, मयत अहिरे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे करण्यात आली आहे.
काळ्या फिती लावून काम
जिल्हा परिषदेसमोर दुपारच्या सुमारास आरोग्य कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. आंदोलनात विजय सोपे, बाळासाहेब ठाकरे, एकनाथ वाणी, बाळासाहेब कोठावदे, किशोर अहिरे, अमोल बागुल, अनिल भामरे, प्रवीण पाटील, विलास पगार आदींसह आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.