कौळाणेत गर्भपात प्रकरणी फरार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 04:48 PM2019-01-31T16:48:27+5:302019-01-31T16:49:12+5:30

पोलिस कोठडी : संशयित आरोपींची संख्या झाली सहा

The accused arrested in absconding case | कौळाणेत गर्भपात प्रकरणी फरार आरोपीस अटक

कौळाणेत गर्भपात प्रकरणी फरार आरोपीस अटक

googlenewsNext
ठळक मुद्देगर्भपात प्रकरणात गोळ्या पुरविणाऱ्या मेडिकल व डॉक्टरचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील कौळाणे शिवारात बेकायदा गर्भपात प्रकरणातील फरार संशयीत आरोपी रवी पवार (रा. शिवाजीवाडी कॅम्प) याला कॅम्प पोलीसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर यापूर्वी अटक केलेल्या डॉ. राहुल गोसावीच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रेमीयुगलासह दाम्पत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे.
गर्भपात प्रकरणात गोळ्या पुरविणाऱ्या मेडिकल व डॉक्टरचा पोलीस यंत्रणा शोध घेत आहेत. या प्रकरणातील संशयीत आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.गेल्या २१ जानेवारी रोजी अवैधरित्या गर्भपात करुन मालेगाव मनमाड रस्त्यावरील शेतात अर्भक पुरणा-या मानसी अनिल हडावळे, संगम ईश्वर देशमुख, सनी नितीन तुपे, वैष्णवी नितीन तुपे चौघे रा. महात्मा फुलेनगर एमआयडीसी भोसरी तालुका हवेली, जि. पुणे या चौघांना किल्ला पोलीसांनी अटक केली होती. चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आता हे चौघे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील संशयीत डॉ. राहुल गोसावी याने अर्धवट शिक्षण घेतले असल्याचे समोर आले आहे. शहरातील एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम बघत होता. या प्रकरणाची चौकशी करणा-या आरोग्य समितीने गोसावीची पेमेंट स्लिप हस्तगत केली आहे. या गर्भपात करण्यास सहाय्य करणा-या रवी पवार याचा शोध पोलीस घेत होते. पवार यालाही अटक करण्यात आली आहे. या गोरख धंद्यात काही खाजगी डॉक्टरर्स अडकल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे.
 

Web Title: The accused arrested in absconding case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.