धामोडे येथील घरफोडीतील आरोपी गजाआड
By admin | Published: January 25, 2017 12:42 AM2017-01-25T00:42:15+5:302017-01-25T00:42:32+5:30
धामोडे येथील घरफोडीतील आरोपी गजाआड
येवला : तालुक्यातील धामोडे येथे १५ दिवसांपूर्वी राजेंद्र येवले यांच्या राहते घरी दिवसा गावात टेहळणी करून रात्री झालेल्या घरफोडीत चाळीस हजाराचा ऐवज लुटून पलायन केलेले तीन संशयित आरोपी येवला तालुका पोलिसांनी गजाआड केले आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडून पोलिसांनी एक मोबाइल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ,धामोडे येथे ६ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमरास २५ ते ३० वयोगटातील साडे चार ते पाच फुट उंचीचे सडपातळ बांधा असलेले चोरटे राजेंद्र येवले यांच्या राहते घरी घरफोडी करीत,घरातील २० हजार रोख रकमेसह सोने व चांदीचे दागिनेसह ३९ हजार ५०० रु पयांचा ऐवज घेऊन पसार झाले. याबाबत राजेंद्र येवले रा.धामोड ह.मु.मुंबई यांनी येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर घटनास्थळी भेट देऊन गुन्हेगारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तालुक्याच्या चारही दिशांनी चार पथक रवाना केली होती. दरम्यान या घरफोडी प्रकरणात काही संशियत आरोपी तपासले.यातून धामोडे घरफोडीचा तपास लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जगदीश उपलिंग चव्हाण(२८),धोंडीराम अशोक गायकवाड (३१),नितीन तराईत चव्हाण(२७) सर्व राहणर अनकुटे ता .येवला यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शहानुर शेख, पोलिस कॉँस्टेबल सुभाष निकम करीत आहेत. (वार्ताहर)