नाशिक मनपात कर्मचारी दहशतीखाली असल्याचा म्युनिसीपल कर्मचारी सेनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:18 PM2018-08-03T14:18:00+5:302018-08-03T14:21:42+5:30

नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 The accused of the municipal staff is accused of being abducted in Nashik Manpower | नाशिक मनपात कर्मचारी दहशतीखाली असल्याचा म्युनिसीपल कर्मचारी सेनेचा आरोप

नाशिक मनपात कर्मचारी दहशतीखाली असल्याचा म्युनिसीपल कर्मचारी सेनेचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देधारणकर आत्महत्येप्रकरणी वातावरण तापले दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी गुरु वारी (दि.२) गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्हा रूग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी आढळल्याने केल्याचे समोर आल्याने अधिकारी, कर्मचारी वर्गात प्रशासनाविषयी संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत. शुक्र वारी (दि.३) सकाळी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेच्यावतीने राजीव गांधी भवनात संजय धारणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महापौर रंजना भानसी, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, भाजपा गटनेते संभाजी मोरु स्कर, नगरसेविका हेमलता पाटील आणि तसेच कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष आणि नगरसेवक प्रविण तिदमे यांनी मनपा कर्मचारी दहशतीत काम करत असून त्यांच्यावरील अतिरिक्त कामाचा तणाव कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. संजय धारणकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया अधिकाºयांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी संख्या अतिशय कमी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गावर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धारणकर यांना जीव गमवावा लागला. सतत निलंबन, बडतर्फ यासारख्या कारवाईची भीती अधिकारी आणि कर्मचारी वर्गात निर्माण केली जात आहे.

कामाचा अतिरिक्त ताण वाढल्यानेच आत्महत्येसारखी पावले उचलली जात आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर असलेला कामाचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी कामाचे सुयोग्य नियोजन व्हावे, प्रशासनाने तातडीने नोकर भरती करण्यासाठी पावले उचलावी अश्या प्रमुख मागण्या म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेने मनपा आयुक्तांकडे केल्या आहेत. अधिकारी, कर्मचाºयांवर दबाव आणल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने निवेदनात दिला आहे.
.........
पोलीसांनाही निवेदन
कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण तिदमे यांनी गंगापूररोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना निवेदन देऊन धारणकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अधिकार्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीची प्रत मिळावी अशी मागणी केली आहे. कामाचा अतिरिक्त ताण असल्यास अथवा वरिष्ठ अधिकारी दबाब आणत असल्यास मनपा अधिकारी, कर्मचार्यांनी टोकाचे पाऊल न उचलता कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रविण तिदमे यांनी केले आहे.

Web Title:  The accused of the municipal staff is accused of being abducted in Nashik Manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.