नाशिक मधील भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील आरोपीला पाच वर्षांनी बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 06:00 PM2021-05-25T18:00:28+5:302021-05-25T18:04:34+5:30

नाशिक  : पाच वर्षापूर्वी मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगरमध्ये झालेल्या भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयितास पंचवटी पोलीसांनी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथून सोमवारी अटक केली आहे. तब्बल पाच वर्षांनी या गुन्ह्यातील एकविसावा संशयित  पकडण्यात आला आहे. रवींद्र दगडुसिंग परदेशी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

Accused in murder of Bhelbhatta seller in Nashik handcuffed after five years | नाशिक मधील भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील आरोपीला पाच वर्षांनी बेड्या

नाशिक मधील भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील आरोपीला पाच वर्षांनी बेड्या

googlenewsNext
ठळक मुद्दे पंचवटीतील क्रांती नगर येथील प्रकरणएकूण एकवीस संशयितांवर गुन्ह्याचा ठपका

नाशिक  : पाच वर्षापूर्वी मखमलाबाद रोडवरील क्रांतीनगरमध्ये झालेल्या भेळभत्ता विक्रेत्याच्या खुनातील फरार संशयितास पंचवटी पोलीसांनी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथून सोमवारी अटक केली आहे. तब्बल पाच वर्षांनी या गुन्ह्यातील एकविसावा संशयित  पकडण्यात आला आहे. रवींद्र दगडुसिंग परदेशी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पाच वर्षांपूर्वी क्रांतीनगर येथे भेळभत्ता विक्री करणारे हेमंत रामदास वाघ व त्याचा भाऊ सुनिल रामदास वाघ या दोघांवर पूर्ववैमनस्यातून जमावाने हल्ला केला होता. त्यात सुनिल वाघचा मृत्यू झाला होता तर हेमंत गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी एकूण वीस  संशयितांना बेड्या ठोकल्या तसेच त्यांच्यावर मोक्का लावला. खुनाच्या घटनेपासून रवींद्र परदेशी फरार होता. पोलिसांनी अनेकदा त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी होत होता. काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना परदेशी दिंडोरी तालुक्यातील जोरण येथे त्याच्या तीन पत्नी समवेत राहत असल्याची माहिती गुप्त बातमी दारामार्फत मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार  यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जोरण गाठले. परदेशी गावात असल्याची खातरजमा होताच पोलिस कर्मचारी घनश्याम महाले हे त्याच्यावर तीन दिवस पाळत ठेवून होते. काल सोमवारी परदेशी जोरण येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळताच त्याला शिताफीने अटक केली.

या गुन्ह्यात परदेशी याच्यासह त्याच्या दोन मुले, पुतण्या आणि एकवीस संशयित असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. परदेशीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
Web Title: Accused in murder of Bhelbhatta seller in Nashik handcuffed after five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.