खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गोव्यातून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:27 AM2019-05-25T01:27:10+5:302019-05-25T01:28:30+5:30
चांदवड बसस्थानक परिसरात भरदिवसा खून करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात चांदवड बसस्थानक परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चांदवड : चांदवड बसस्थानक परिसरात भरदिवसा खून करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात चांदवड बसस्थानक परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चांदवड शहरातील रहिवासी इम्रान फारूख शेख यांचा मुलगा सद्दाम शेख (२५) याला त्याचा आडगाव टप्पा येथील मित्रप्रेम निवृत्ती पवार याने अज्ञात कारणावरून झालेल्या वादात तिक्ष्ण हत्याराने छातीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी करत जिवे ठार मारले होते.
घटनेनंतर गुन्ह्णातील संशयित प्रेम पवार फरार होता. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्णाचा तपास सुरू करीत संशयिताच्या नातेवाईक, मित्रांवर करडी नजर ठेवली होती.
सिनेस्टाइलने पाठलाग
संशयित गोव्यात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी गोव्यातील आरपोरा भागात एका गादी भांडाराच्या दुकानावर कामास असलेल्या संशयित प्रेम पवार यास पकडण्यासाठी २२ मे २०१९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला होता. परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढल्याने सिनेस्टाइलने पाठलाग करत पोलिसांनी पवारच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, संशयितास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली
दिली आहे.