तिकीट विकल्याचा आरोप; १० इच्छुकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:47 AM2017-11-05T00:47:56+5:302017-11-05T00:48:00+5:30

आगामी नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे येथे शनिवारी ११ इच्छुक उमेदवारांच्या राज्य टीडीएफकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. संघटनेत योगदान दिलेल्या व चळवळीत काम करणाºया शिक्षकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह १० इच्छुकांनी धरला. परंतु केवळ आर्थिक संपन्नता हा निकष लावून एकाच उमेदवारला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, व टीडीएफच्या पदाधिकाºयांनी तिकीट विकल्याचा आरोप करीत १० इच्छुकांनी मुलाखतींवर बहिष्कार टाकला.

 Accused of selling tickets; 10 boycott of want | तिकीट विकल्याचा आरोप; १० इच्छुकांचा बहिष्कार

तिकीट विकल्याचा आरोप; १० इच्छुकांचा बहिष्कार

Next

येवला : आगामी नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे येथे शनिवारी ११ इच्छुक उमेदवारांच्या राज्य टीडीएफकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. संघटनेत योगदान दिलेल्या व चळवळीत काम करणाºया शिक्षकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह १० इच्छुकांनी धरला. परंतु केवळ आर्थिक संपन्नता हा निकष लावून एकाच उमेदवारला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, व टीडीएफच्या पदाधिकाºयांनी तिकीट विकल्याचा आरोप करीत १० इच्छुकांनी मुलाखतींवर बहिष्कार टाकला. १० इच्छुक उमेदवारांनी बहिष्काराचे रीतसर पत्र टीडीएफ अध्यक्ष राज्य विजय बहाळकर यांना दिले. दरम्यान याच ठिकाणी निषेधाची सभा घेण्यात येऊन, राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष, फिरोज बादशहा यांच्या नेतृत्वाखाली या १० पैकी एकाला उमेदवारी देऊन त्याचे काम सर्वांनी करावे, असे एकमताने ठरविण्यात आले. उपस्थित इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांनी टीडीएफ पदाधिकाºयांच्या निषेधाच्या घोषणा देत तिकीट विकल्याचा जाहीर आरोप करत, पदाधिकाºयांचे धिंडवडे काढले. टीडीएफच्या उमेदवारी वाटपाच्या इतिहासात पहिल्यांदा खास मुंबई येथून बाउन्सर बोलविण्यात आले होते.  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत टीडीएफ संघटनेच्या वतीने टीडीएफ संघटनेत कार्यरत असलेल्या शिक्षक कार्यकर्त्यांना डावलून टीडीएफ संघटनेशी काहीही संबंध नसलेल्या उमेदवारास आर्थिक देवाणघेवाणीतून तिकीट देण्याचा घाट घातल्याचा स्पष्ट आरोप १० इच्छुकांनी केला. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील टीडीएफ संघटनेशी निगडित अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमधील क्रि याशील इच्छुक दहा उमेदवारांनी निवडणूक मुलाखतीवर बहिष्कार घालून १० उमेदवारांपैकी कोणीही एकाने उमेदवारी करून इतरांनी पाठिंबा देण्याचा घेतला आहे.  याप्रसंगी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव व इच्छुक उमेदवार आप्पासाहेब शिंदे म्हणाले टीडीएफच्या इतिहासातील काळा दिवस आज ठरला. आम्हा २५ व ३० वर्षे टीडीएफ शिक्षक संघटनेसाठी हयात घालवणाºया प्रामाणिक लोकांना टाळून ४ महिन्यांपूर्वी संघटनेशी काही संबंध नसताना फक्त उमेदवारीसाठी सलगी नामधारी शिक्षकास उमेदवारी देण्याचा घाट घातला आहे. याविरोधात आम्ही नाशिक शिक्षक मतदार संघातील इच्छुक १० उमेदवारांपैकी कोणीही एका उमेदवारास उमेदवारी देऊन विजयी करणार आहोत व विकाऊ पदाधिकाºयांना धडा शिकवून उमेदवार विजयी करण्याचा निश्चय केला. याप्रसंगी भाडोत्री बाउन्सरचा वापर करून इच्छुक उमेदवारांना बळजबरी व दमदाटी करण्याचा व लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते सुभाष कुलकर्णी, चांगदेव कडू, महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशन उपाध्यक्ष नंदकुमार शितोळे, प्रशांत होन, संतोष ठाणगे, सुनील दानवे, मंगेश काळे, विजय थोरात, उद्धवराव सोनवणे, महेंद्र हिंगे, अर्जुन भुजबळ, जनार्दन पटारे, भाऊसाहेब जिवडे, सुदाम दळवी, हरिश्चंद्र नलगे, सुधीर काळे यांसह नाशिक शिक्षक मतदार संघातील पाच जिल्ह्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. 
नासिक विभाग शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी शाळीग्राम भेरूड, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र लांडे ,भाऊसाहेब कचरे, निशांत रंधे , आर डी निकम , विठ्ठल पानसरे , एम एस लगड, एस बी देशमुख, ए.एस.लाठर आदींनी उमेदवार मुलाखतीवर बहीष्कार टाकला.व एकित्रत पणे निवेदन दिले. याप्रसंगी इच्छुक उमेदवारांनी उमेदवार निवड प्रक्रि येवर बिहष्कार टाकला . यापप्रसंगी टिडीएफचे राज्यउपाध्यक्ष चांगदेवराव कडु यांचे अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली.

Web Title:  Accused of selling tickets; 10 boycott of want

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.