‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 01:29 AM2019-02-15T01:29:33+5:302019-02-15T01:29:51+5:30

कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घटना घडली.

'The accused's father's suicide' | ‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

‘त्या’ आरोपीच्या वडिलांची आत्महत्या

Next
ठळक मुद्देसोने चोरी प्रकरण : भगूर बसस्थानकावर घटना

नाशिक : कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत ऊर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा. कामटवाडे, वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगूर बसस्थानकावर आत्महत्या केल्याची घटना घडली.
टिळकवाडी येथील पाटील यांच्या बंगल्यावर म्हस्के नोकरदार म्हणून मोलमजुरी करत होते. महिनाभरापूर्वी त्यांच्या धाकट्या अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजारांची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे बुधवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला असून, कुटुंबाचा आधार हरपला आहे. त्यांच्या मृतदेहावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी त्यांना देवळालीच्या छावनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. त्यांचे जावई अनिल गंगाधर हतांगळे यांनी त्यांची ओळख पटविली. मयत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.
म्हस्के हे बुधवारी भगूर बसस्थानक परिसरात अचानकपणे निघून गेले. त्यांनी तेथे विषारी औषध सेवन केले. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ भगूर पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

Web Title: 'The accused's father's suicide'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.