कुतरमाळ येथे आचार्य प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:45 PM2020-12-23T21:45:43+5:302020-12-24T00:56:41+5:30
त्र्यंबकेश्वर : एफटीएस अर्थात फ्रेंडस् ऑफ ट्रायबल सोसायटीतर्फे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांसाठी एकल अभियानाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कुतरमाळ येथे हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत आचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यत्वे आदिवासी तालुक्यात हे एकल अभियान राबविण्यात येत असून साधारण ३० गावे मिळून एक संच तयार केला जातो. प्रत्येक संचाला एक संच प्रमुख असतो आणि संचातर्फे प्रत्येक गावासाठी एक आचार्य मार्गदर्शन करत असतो. त्र्यंबकेश्वर तालुक्यात असे १६ संच असून त्यांच्यामार्फत मुलांना तसेच प्रौढांना देखील शिक्षण दिले जाते. एकल अभियानात जैविक खताबरोबर शासन गावासाठी, आदिवासी बांधवांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती देउन या योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, आचार्य प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन व्यास कथाकार मंगेश कडाळी तसेच ओझरखेड संच समितीचे अध्यक्ष प्रकाश मौले, योगिता मौले यांच्या हस्ते करण्यात आले.