सावरगाव गणात प्रतिष्ठा पणाला
By Admin | Published: February 12, 2017 12:08 AM2017-02-12T00:08:46+5:302017-02-12T00:08:58+5:30
चुरस : गण महिला राखीव झाल्याने हिरमोड
सागर रायजादे येवला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यात शिवसेनेने उभ्या केलेल्या कडव्या आव्हानाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासून त्यात सावरगाव गण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
राखीव झाल्याने पुरु ष नेत्यांचा हिरमोड झाला असला तरी त्यांच्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून येवला पंचायत समितीच्या सभापतिपदावर कसे बसवता येईल यासाठी आटापिटा सुरु आहे.
येवला पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव निघाल्याने या गणातील निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आजी-माजी यासह सर्वांचेच अस्तित्व पणाला लागणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने गणासाठी याच समीकरणाचा विचार करून सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या नगरसूल गावाचा विचार करून दोन्ही उमेदवार याच गावात देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून होत आहे. हा गट पूर्वाश्रमीचा कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, सेना-भाजप युती अशा वेगवेगळ्या पक्षांच्या प्राबल्याखाली होता. यापूर्वी या गणाचा समावेश पाटोदा गटात होता. गट-गणाच्या निर्मितीत सावरगाव गणातील काही गावांचा
समावेश दुसऱ्या गणात करण्यात आला. असे असले तरी शिवसेनेचे नेते संभाजीराजे पवार यांचा या गट व गणावर मोठी पकड आहे. याचे उदाहरण द्यायचेच झाले तर त्यांनी पंचायत समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीतदेखील राष्ट्रवादीला सामोरे जावे लागले आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने दिलीप मेंगळ विजयी झाले होते हा इतिहास आहे.
या गणात डॉ. सुधीर जाधव यांना उमेदवारी करण्याची इच्छा असताना त्यांची उमेदवारी डावलली गेली. परंतु विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन नरेंद्र दराडे व डॉ. सुधीर जाधव यांची नाराजी दूर करतील असे बोलले जाते. संभाजीराजे पवार व नरेंद्र दराडे यांच्यापुढे बंडाळी टाळण्याचे आव्हान आहे.