केंद्रीय लोकसेवा परीक्षेत निकेतन कदमचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 07:19 PM2019-04-14T19:19:04+5:302019-04-14T19:19:32+5:30
मेशी : येथील रहिवासी व जनता विद्यालयाचा माजी विद्यार्थी निकेतन बन्सीलाल कदम याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. त्याचा देशात ४५९ क्र मांक आला असुन आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

घरची परिस्थिती जेमतेम असून केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने यश मिळविले आहे. त्याचे वडील वीज कंपनीचे सेवानिवत्त कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे दहावी पर्यंतचे शिक्षण मेशी येथील जनता विद्यालयात झाले आहे. त्यामुळे मेशी ग्रामस्थांनी आणि विद्यालयाने त्याचा सत्कार केला आहे.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डी. जे. रणधीर आणि कर्मचारी तसेच गावातील श्रीराम बोरसे, तुषार शिरसाठ, बापू जाधव, उपसरपंच भिका बोरसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(फोटो १४ मेशी)
मेशी येथील निकेतन कदमचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याने सत्कार करताना ग्रामस्थ.