निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत त्र्यंबक महाविद्यालयाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 10:08 PM2019-07-07T22:08:46+5:302019-07-07T22:10:21+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाने धुळे येथे झालेल्या निसर्गमित्र राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले. धुळे येथील महाराष्टÑ शासन निसर्गमित्र समितीच्या वतीने प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्टÑ शासन निसर्गमित्र समितीच्या वतीने पर्यावरण विषयावर सामान्यज्ञान, रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत त्र्यंबक महाविद्यालयाच्या ज्योती डंबाळे हिने प्रथम, योगीता झोंबाड द्वितीय, तर जनता विद्यालयातील ओमकार पवार या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. गुणवंत विद्यार्थ्यांचा समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
दरम्यान प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांचा गुणवंत प्राचार्य म्हणून सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक तुषार धोंडगे व प्रा. विनायक पवार यांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमा पवार, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक सचिन पिंगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.