सीबीएसई शाळांचे दहावीच्या परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:49 AM2018-05-30T00:49:13+5:302018-05-30T00:49:13+5:30
सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांशी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, या परीक्षेत मुलींनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बाजी मारली आहे.
नाशिक : सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांशी शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, या परीक्षेत मुलींनी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी बाजी मारली आहे.
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीनित अहेरने ९४.२० गुण मिळवून प्रथम क्र मांक पटकावला असून, यशश्री अहिरेने ९२.८० टक्के गुणांसह द्वितीय व प्रणव पाटीलने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. शाळेतील ९१.२० टक्के गुण मिळविणारा ओम जाधव चौथ्या स्थानावर असून, प्रतीक जाधवने ९०.२० टक्के गुणांसह पाचवे स्थान पटकावले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली.
केंद्रीय विद्यालय देवळाली
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत केंद्रीय विद्यालय देवलालीमधील परीक्षेत सर्वच्या सर्व १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कल्याणी नायर हिने ९४.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला असून, ज्ञानेश्वर कोष्टी याने ९३.४० गुण मिळवून दुसरा व साक्षी वर्मा हिने ९१ टक्के गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय विद्यालय देवळाली १ शाळेचा शंभरटक्के निकाल लागला आहे. शाळेतून या परीक्षेसाठी ११० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १०९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत शाळेतील प्रतीक्षा गुरुले ९०.८० टक्के गुण मिळवले असून, विनयकुमार यादवने ९०.६०, विगिशा झाने ८९.६०, सुधांशू मिश्राने ८९.४०, अनुष्का सिंग हिने ८८.८८ व पीयुश पंत याने ८८.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
केंद्रीय विद्यालयात आयुष प्रथम
नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयातील ९४.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेतील आयुष कुमार याने ४७४ गुणांसह ९४.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयातील एकूण ११७ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी १११ म्हणजे ९४.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. शाळेत सर्वाधिक गुण मिळ विणाऱ्या आयुष कुमार पाठोपाठ अंकिता कार ४७१ गुणांसह ९४.२ टक्के मिळवून दुसरा व पृथ्वीराज सिंग बेलोदे याने ४६९ गुणांसह ९३.८ टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला असून शाळेतील उत्तीर्ण झालेल्या अन्य सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळालेले असल्याने मुख्याध्यापक बी. ए. लोंढे यांच्यासह शाळा प्रशासनाने आनंद व्यक्त केला आहे.
दिल्ली पब्लिक स्कूलला वैदेही प्रथम
सीबीएसई दहावीच्या परीक्षेत दिल्ली पब्लिक स्कूलचा ८६.१८ टक्के निकाल लागला असून, शाळेतील वैदेही सिन्हा हिने ९७.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्र मांक मिळवला. तसेच वेद शिंदे ९७.२ टक्के गुण, तर आदित्य राठी ९६.६ टक्के गुणांसह अनुक्र मे द्वितीय व तृतीय क्र मांक पटकावला आहे. शाळेतील ४० टक्के विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले असून, तर १५ टक्के विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहे. गणित विषयात सात विद्यार्थ्यांनी ९९ गुण, इंग्रजी विषयात पाच विद्यार्थ्यांना ९८ गुण, संस्कृत विषयामध्ये ११ विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत. विज्ञान व सामाजिकशास्त्र विषयात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
सिम्बॉयसिसमध्ये निहारिका कुटे प्रथम
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सिम्बॉयसिस स्कूलमध्ये निहारिका कुटे हिने प्रथम क्रमांक पटकवला असून, शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सिबीएसई दहावीच्या परीक्षेत सिम्बॉयसीस शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, शाळेत निहारिका कुटे ९८ टक्के घेऊ प्रथम क्रमांक पटकावला असून, तिने गणित विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहे, तर ९६.८ टक्के गुणासह प्रथम कापुरे द्वितीय व ९६.६ टक्के गुणांसह सोहम करंदीकर याने तिसºया स्थानावर यश संपादन केले आहे. तर यश निकम याला ९६ टक्के गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील रेन्सी गाजीपारा हिने गणितात १०० पैकी शंभर गुण मिळवले असून, सोहम करंदीकर याने विज्ञान विषयात ९९ गुण मिळवले आहे. इंग्रजीमध्ये सई पाटील व साहिल नवले यांनी ९७ गुण मिळविले असून, हिंदीमध्ये निहारिका कुटे, प्रज्वल खोकले, साहिल नवले, जानवी बयानवार, पलक कासलीवाल, जान्हवी मोरे, ऋषिका शिंपी, सिद्धार्थ सिंग, प्रथम कापुरे, सिद्धांत जाधव, अवंतिका दीक्षित श्रेया दुबे या विद्यार्थ्यांनी ९९ गुण मिळवले असून, एसएसटी विषयामध्ये अनुष्का बुरकुले आयुष अग्निहोत्री व चैताली चौधरी यांनी ९९ गुण मिळवून यश संपादन केले आहे.
केंब्रिज : शाळेत अनुष्का कुलकर्णी प्रथम
नाशिक : सीबीएसई बोर्डाच्या निकालामध्ये नाशिक केंब्रिज शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून, यावर्षीही शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट १९२ विद्यार्थ्यांपैकी अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला असून, उर्वरित सर्व विद्यार्थी चांगले गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. केंब्रिज शाळेतील विद्यार्थिनी अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला असून, निधी देशकने ९५.६ टक्के गुणांसह द्वितीय व समृद्धी डेरे हिने ९५.४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेतील परीक्षेला बसलेलेल सर्व १९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यातील सुमारे १५ हून अधिक विद्यार्थांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यात केतन सुरवसे याला ९५.१ टक्के व जान्हवी सोनावणे ९५ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यापरीक्षेत शाळेतील सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्याने शाळेच्या ट्रस्टी भारती रामचंद्रन व मुख्याध्यापक विजया पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
विद्या प्रबोधिनीत वैष्णवी कासार प्रथम
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. वैष्णवी कासार हिने ९६.८ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रथमेश पाटील याने ९६.६ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर नेहा कुरडे हिने ९६.४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
आर्मी पब्लिक स्कूलची मिताली भटाड
देवळाली येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या केंद्रीय विद्यालयाची मिताली भट्टाड हिने ९८ टक्के मिळवून गुण मिळवून शाळेत प्र्रखम क्रमांक पटकावला असून, या परीक्षेत आर्मी पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत आर्मी पब्लिक स्कूलचे सर्व १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळविणाºया उमंग यादवने समाजशास्त्र विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले असून, तीला सर्व विषयांमध्ये ९७.२० गुण मिळाले आहेत, तर तिसरा क्रमांक मिळविणाºया आकांशा पंकजला ९७ टक्के गुण मिळाले आहेत. या परीक्षेत शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.