सलग सुट्यांची साधली पर्वणी

By admin | Published: June 25, 2017 12:22 AM2017-06-25T00:22:26+5:302017-06-25T00:22:42+5:30

सलग तीन दिवस सुट्या जुळून आल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड टुरिझम’ला पसंती दिली.

Achievements for consecutive holidays | सलग सुट्यांची साधली पर्वणी

सलग सुट्यांची साधली पर्वणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह विविध तालुक्यांमध्ये आद्राच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली तसेच सलग तीन दिवस सुट्या जुळून आल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड टुरिझम’ला पसंती दिली.
चौथा शनिवार आणि सोमवारी रमजान ईदनिमित्त असलेली शासकीय सुटीमुळे बॅँका, खासगी व शासकीय कार्यालये दिवस बंद राहणार असल्यामुळे शहरातील नोकरादारवर्गाने पर्यटनाचा बेत आखला आहे. तालुक्यांमधील परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल झाले आहे. नागरिकांनी सलग तीन दिवसांच्या सुटीची संधी साधत वीकेण्ड पर्यटनासाठी आगाऊ नोंदणी राज्य पर्यटन महामंडळासह विविध खासगी संस्थांकडेही केली आहे. वीकेण्डचा बेत आणि त्यातच सुरू झालेली संततधारेने पर्यटकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला आहे.  शहरात जरी सकाळी पावसाला सुरुवात झाली असली तरी त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, चांदवड, निफाड या तालुक्यांमध्ये मध्यरात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. या भागातील निसर्ग सौंदर्य वाढत असून, मुंबई, पुणे, नाशिकच्या पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचे आकर्षण होत आहे. यामुळे अनेकांनी शनिवारी पावसाच्या संततधारेमध्येच पर्यटनस्थळी कूच केले. इगतपुरीजवळील भावली धरण परिसरासह, त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी, पहिने, मोखाडा रस्ता, गंगापूर धरण परिसर, काश्यपी धरणाजवळील वाघेरा घाट परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. डोंगरमाथ्यावरून कोसळणारे पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि पावसाच्या संततधारेचा आनंद घेत धम्माल केली.

Web Title: Achievements for consecutive holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.