अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 01:42 AM2019-10-20T01:42:29+5:302019-10-20T01:43:03+5:30
अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद्ध गायक विक्रम हजरा यांनी कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘गीतसत्संग’ कार्यक्रमात भाविकांची सायंकाळ भक्तिमय केली.
नाशिक : अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद्ध गायक विक्रम हजरा यांनी कालिदास कलामंदिर येथे आयोजित ‘गीतसत्संग’ कार्यक्रमात भाविकांची सायंकाळ भक्तिमय केली.
आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे नाशिकमध्ये येत असून, त्यानिमित्ताने भाविकांसाठी ‘गीतसत्संग’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्संगात हजरा यांच्या सुमधुर आध्यात्मिक गीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. साधना, ध्यान आणि सत्संगातून तुमच्या आतील आवाजाला व ब्रह्मज्ञानी गुरुंच्या शिकवणीला तुम्ही जाणून घेऊ शकतात, असे हजरा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी समन्वयक विजय हाके, स्वामी वैशंपायन, स्वामी प्रणवानंद, खंडू गांगुर्डे, अर्जुन गोटे, संजय बडवळ, राहुल पाटील, निवृत्ती भाबड, प्रसाद पिंपळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली कुलकर्णी यांनी केले.
भाविकांची दाद
विक्रम हजरा यांनी सत्संगात ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’, ‘कौसल्येचा राम बाई’, ‘ओम नमो नारायणा’, ‘देना हों तो तेजीये’, ‘नारायण-नारायण जय गोपाल हरे’, ‘पांडुरंग जय हरी विठ्ठल’, ‘जन्मजन्म का साथ’, यांसह अनेक भक्तिगीतांनी या सत्संगात रंग भरले. ते सादर करत असलेल्या प्रत्येक आध्यात्मिक गाण्याला भाविकांची भरभरून दाद मिळत होती.