पाणी टंचाईमुळे खाजगी विहीरीकेल्या अधिग्रहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:47 PM2019-04-08T18:47:53+5:302019-04-08T18:49:40+5:30
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या.
पाणी टंचाईवर उपाय म्हणून कारभारी महादु पवार, भाटु छोटु चव्हाण (गट नंबर २१) आणि बद्री महादु चव्हाण यांच्या (गट नंबर २३) विहीरी दि.९ जानेवारी ते ३० जुन २०१९ या कालावधीसाठी अधिग्रहित केल्या आहे. सध्या या तीनही विहिरींचे पाणी एकत्र करून नंतर पाणी पुरवठा योजनेद्वारे (रोटेशन) चक्र पध्दतीने आठ दिवसातुन एकदा नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत सोडण्यात येत आहे.
अधिग्रहित केलेल्या विहिरीच्या मालकांना शासननिर्णयानुसार त्यांच्या परिवारातील सदस्यांना आणि पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ३० टक्के पाणी आणि उर्वरित सर्व ७० टक्के पाणी हे ग्रामपंचायतीने नागरिकांना विहिरीतून काढून सार्वजनिक पाणी पुरवठा करणे असे परिपत्रक असते. परंतु येथील शेतकरी कारभारी महादु पवार आणि त्यांचा मुलगा किशोर हे यांच्या गट नंबर २१ मधील विहिरीतून आठवड्यातून गुरु वार आणि रविवार या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी रात्री अपरात्री जाऊन तसेच दिवसाही मनमानी करु न पाणी पुरवठा कर्मचारी रज्जाक भेनुभाई शेख, सोपान विश्वनाथ खिरडकर आणि लाला रज्जाक शेख दमदाटी करून शासन निर्णयाची पायमल्ली करु न त्यांच्या गरजे व्यतीरीक्त पाणी उपसा करु न शासनाचे विहीर अधिग्रहित भाडे सहाशे रु पये घेऊन या कडाक्याच्या उन्हाळ्यात सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतांना सुमारे तीन एकर कांदे आणि डोंगळे भाजीपाल्यासाठी व इतर पिकांसाठी पाणी उपसा करत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न भेडसावत आहे.
गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणे आवश्यक असून त्यास अडथळा करु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे. यापूर्वी तीन वेळा तोंडी समाज देण्यात आली आहे. तरीसुद्धा सदर विहीर मालक अडथळा आणत असतील तर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नांदगाव पोलीसांकडे पत्र देऊन कारवाई करावी लागेल.
- जयश्री लाठे
सरपंच, जातेगाव.