एक एकरमधील फुलशेती भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:33 PM2020-03-30T12:33:28+5:302020-03-30T12:34:23+5:30

नांदूरवैद्य : कोरोनामुळे शेतमालाची निर्यातही बंद असतांनाच बेमोसमी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रूक येथील एक एकरवरील फुलशेती भुईसपाट झाली आहे.

 An acre of flowering grassland | एक एकरमधील फुलशेती भुईसपाट

एक एकरमधील फुलशेती भुईसपाट

Next

नांदूरवैद्य : कोरोनामुळे शेतमालाची निर्यातही बंद असतांनाच बेमोसमी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रूक येथील एक एकरवरील फुलशेती भुईसपाट झाली आहे. शिवाय टोमॅटो, कांदे, गहू, फ्लावर, कोबी,हरभरे ही पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत.
विजेच्या जोरदार कडकडाटासह झालेल्या गारपिटीत इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद बुद्रुक येथील शेतकरी दौलत किसन बांबळे यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या शेतातील एक एकरामध्ये अँस्टर या प्रजातीच्या फुलांची लागवड केली होती. दोन एकरात कोबी, फ्लावर, मका ही पिके लावली होती.नाशिक शहराची ओळख फुलांचे शहर अशी जरी असली तरी कोरोना व्हायरसने देशात घातलेल्या थैमानामुळे व अत्यावश्यक सुविधा वगळून इतर दैनंदिन व्यवहार बंद असल्या कारणाने शेतमालाची आयात-निर्यात बंद असल्याने फुलवलेली हजारो रु पयांची अँस्टरची फुले ही शहरी बाजारात विक्र ीस गेली नाही. अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे धास्तावलेला व खचलेला असतांनाच या कोरोनाच्या संचारबंदीत मध्येच अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. यात या शेतकऱ्याचे एक ते दीड लाख रु पयांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने नुकसान झालेल्या पिकांची लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title:  An acre of flowering grassland

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक