बेशिस्त ११० चारचाकी वाहनमालकांवर कारवाई

By admin | Published: July 1, 2017 12:25 AM2017-07-01T00:25:33+5:302017-07-01T00:25:33+5:30

महात्मा गांधी रोड व वकीलवाडीतील नो पार्किंगमध्ये

Action on 110 unemployed vehicles | बेशिस्त ११० चारचाकी वाहनमालकांवर कारवाई

बेशिस्त ११० चारचाकी वाहनमालकांवर कारवाई

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील वर्दळीच्या महात्मा गांधी रोड व वकीलवाडीतील नो पार्किंगमध्ये बेशिस्तपणे उभ्या केलेल्या ११० चारचाकी वाहनांवर शहर वाहतूक विभागाने शुक्रवारी (दि़ ३०) जॅमर लावून कारवाई केली़ यावेळी कारवाई करणाऱ्या पोलिसांसोबत नागरिकांनी वाद घालण्याचा प्रयत्न केला; मात्र वरिष्ठ अधिकारी याठिकाणी उपस्थित असल्याने दंड भरण्याशिवाय पर्याय नव्हता़ गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत १८५ चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़
महात्मा गांधी रोडवर वाहनधार बेशिस्तपणे वाहने पार्क करीत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होते़ त्यामुळे या ठिकाणी नो पार्किंगच्या ठिकाणी लागणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित केले आहेत़ गत दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू असल्याने या रस्त्यानेही मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येते़ पोलिसांकडून सुरू असलेल्या या कारवाईबाबत व्यावसायिकांनी पोलिसांनी वाद घातला; मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे त्यांचे काही चालले नाही व त्यांनी तक्रार न करता दंड भरला़
शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांच्या पथकानेही कारवाई केली़

Web Title: Action on 110 unemployed vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.