इगतपुरी शहरात १३ दुकांदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 06:32 PM2019-01-20T18:32:29+5:302019-01-20T18:35:18+5:30
इगतपुरी : शाळा, महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरात सिगारेट, गुटखा, जर्दा व खैनीसारखे तंबाखू जन्य पदार्थ बेकायदेशीररित्या विकणाऱ्या १३ दुकांदारावर इगतपुरी पोलिसांनी कारवाई करत दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी दिली आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपविभाग पोलीस अधिकारी उत्तम कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कोटपा कायद्यांतर्गत इगतपुरी शहरातील महात्मा गांधी शाळा परिसरात १३ दुकानदार तंबाखू जन्य पदार्थ विकताना मिळून आले. त्यांच्यावर कारवाई करत २६०० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या मोहिमेत पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पोलीस कर्मचारी वीनोद गोसावी, मारुती बोराडे, दत्तात्रय वाजे, वैभव वाणी हे सहभागी झाले होते.