७३१ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:36 AM2018-12-15T01:36:56+5:302018-12-15T01:37:07+5:30
वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७३१ रिक्षाचालकांवर शुक्रवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़
नाशिक : वाहतूक नियमांची पायमल्ली करणे, रिक्षा चालविताना परवाना जवळ न बाळगणे, गणवेश परिधान करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील एक हजार ७३१ रिक्षाचालकांवर शुक्रवारी (दि़१९) पोलिसांनी कारवाई केली़
या विशेष मोहिमेतून १ लाख ५० हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आला़ रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढत चालल्याने तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्याने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली़
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ७३१ रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येऊन १ लाख ५० हजार रुपयांचा दंडवसूल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रिक्षाचालकांकडे परवान्यासह वाहनांची कागदपत्रेही नसल्याचे आढळून आले. अशा ९६ रिक्षाचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.