चांदवड शहरात बारा वाहनधारकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:14 PM2020-07-22T21:14:51+5:302020-07-23T01:00:58+5:30

चांदवड : येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर चांदवड पोलिसांनी कारवाई केली, तर १२ वाहन-धारकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला.

Action against 12 vehicle owners in Chandwad city | चांदवड शहरात बारा वाहनधारकांवर कारवाई

चांदवड शहरात बारा वाहनधारकांवर कारवाई

Next

चांदवड : येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर चांदवड पोलिसांनी कारवाई केली, तर १२ वाहन-धारकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला.
चांदवड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात अनेक दुचाकीस्वार तीन सिट बसवणे, लायसन्स नसणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे या कारणांवरून वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी मुज्जमील देशमुख, योगेश हेंबाडे यांनी मोटारसायकल व चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करत दोन हजारांचा दंड वसूल केला. नागरिकांनी व वाहनधारकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रदीप पाटील, नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी अभिजित कदम, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी केले आहे.

Web Title: Action against 12 vehicle owners in Chandwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक