पंचवटी ५० दिवसात २,१९५ नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:21+5:302021-05-29T04:12:21+5:30
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यांमार्फत विशेष पथक तैनात करण्यात येऊन पथकाद्वारे नागरिकांत जनजागृती केली ...
नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यांमार्फत विशेष पथक तैनात करण्यात येऊन पथकाद्वारे नागरिकांत जनजागृती केली जाते तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आल्याने पोलीस ठाण्यांमार्फत नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाई सुरू केली जात आहे. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, फिजिकल डिस्टसिंग पालन करावे, तोंडावर मास्क लावणे बंधनकारक केले आहे तर जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानदारांनी नियमांचे पालन करावे, विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे शासन आदेश असताना अनेकांनी शासन आदेशाला केराची टोपली दाखविली.
ई पास नसताना हद्दीत प्रवेश केला म्हणून २३ नागरिकांवर कारवाई केली तर १ हजार १२८ नागरिक विनामास्क फिरताना आढळून आले. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही म्हणून २०० जणांवर कारवाई करण्यात आली, ७९३ नागरिक विनाकारण फिरत असल्याचे आढळून आहे. ३० विविध दुकानदारांनी कोरोना नियम पालन केले नसल्याने कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केले म्हणून सुमारे १३ लाख १५ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे.