कर्मचाऱ्यांवरील कारवाई; गमे-बडगुजर यांच्यात वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:31 PM2020-05-19T23:31:10+5:302020-05-20T00:08:13+5:30
कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर यांनी लोकप्रतिनिधी काय जेवायला महापालिकेत येतात का? असा प्रश्न केल्याने नूतन समितीच्या पहिल्याच बैठकीत वातावरण तापले. तथापि, गमे यांनीदेखील स्पष्टीकरण देताना समितीला योग्य वाटतील असेच ठराव करावेत, प्रशासन त्याची योग्य ती दखल घेईल, असे सांगितले.
नाशिक : कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाºयावरील कारवाईबाबत अपिलीय अधिकार महापालिकेच्या स्थायी समितीला असतात. परंतु आयुक्त त्यावर सोयीने अंमल करीत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सदस्य सुधाकर बडगुजर यांनी केला. आयुक्त गमे हे दादागिरी करीत असल्याचा आरोप करीत बडगुजर यांनी लोकप्रतिनिधी काय जेवायला महापालिकेत येतात का? असा प्रश्न केल्याने नूतन समितीच्या पहिल्याच बैठकीत वातावरण तापले. तथापि, गमे यांनीदेखील स्पष्टीकरण देताना समितीला योग्य वाटतील असेच ठराव करावेत, प्रशासन त्याची योग्य ती दखल घेईल, असे सांगितले.
समितीची बैठक सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१९) पार पडली यावेळी हा वाद झाला. दीडशेहून अधिक दिवस विनापरवानगी गैरहजर राहणाºया कामाठ्याला कामावर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता, तर महापालिकेने एका शिफ्ट इंजिनिअरला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्याने त्यावर त्या अभियंत्याने अपील केले होते. त्याची बाजू बडगुजर मांडत असताना हा प्रकार घडला. यापूर्वी देवीदास सकट या एका कर्मचाºयाला क्षमापीत करून कामावर घेण्याचा निर्णय समितीने घेतला, परंतु आयुक्तांनी त्यावर कोणत्याही प्रकारचा अंमल केला नाही, असा बडगुजर यांचा आरोप होता. प्रशासन उपआयुक्तांशी ते प्रश्नोत्तरे करीत असतानाच आयुक्तांनी अशाप्रकारे काय बरोबर वाटते ते विचारणे अयोग्य आहे, असे सांगितले. त्यावर बडगुजर यांनी संताप व्यक्तत करीत आपल्याला मनपात तीस वर्ष झाले आहेत. आपल्याला मनपाचे कामकाज चांगलेच माहिती आहे, फार खोलात जाऊ देऊ नका, असा इशारा दिला. अशोक मुर्तडक यांनी कारवाई करताना प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे सांगितले.
भूसंपादनासाठी सादर करण्यात आलेले नऊ प्रस्ताव रद्द करण्यावरून बडगुजर आणि सभापती गणेश गिते यांच्यात खटके उडाले. एकीकडे जागा मालकाला टीडीआर स्वरूपात मोबदला दिला आणि दुसरीकडे मात्र जे आता तेथे आरक्षण नसल्याने भूसंपादन प्रक्रिया रद्द करावी, असे प्रशासन नमूद करते यावरून बडगुजर हे नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर यांना कोंडीत पकडले. मात्र, त्याचवेळी सभापतींनी पुढील सभेत माहितीसह हा विषय घेऊ, असे सांगितल्याने बडगुजर यांनी अशाप्रकारे अधिकाऱ्यांना पाठीशी घालून कामकाज चालणार नाही, असा इशारा दिला.