निर्भया पथकाकडून पाच युवकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:52 PM2020-02-02T23:52:17+5:302020-02-03T00:20:19+5:30

उद्यान, चौक तसेच भररस्त्यात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांतता भंग करीत वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि.३०) असाच प्रकार सिडकोतील उत्तमनगर भागात दुपारच्या सुमारास घडला असून, सार्वजनिक ंिंठकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी पाच युवकांवर निर्भया पथकाकडून करवाई करण्यात आली आहे.

Action against five youths by fearless squad | निर्भया पथकाकडून पाच युवकांवर कारवाई

निर्भया पथकाकडून पाच युवकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देसिडको परिसर : सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे पडले महागात

सिडको : उद्यान, चौक तसेच भररस्त्यात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांतता भंग करीत वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सध्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि.३०) असाच प्रकार सिडकोतील उत्तमनगर भागात दुपारच्या सुमारास घडला असून, सार्वजनिक ंिंठकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी पाच युवकांवर निर्भया पथकाकडून करवाई करण्यात आली आहे.
सिडको व परिसरात अनेक ठिकाणी मित्रपरिवारासह स्वत:ला भाई समजणाऱ्यांकडून भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. याआधी तलवारीने केक कापणे, स्मशानभूमित वाढदिवस साजरा करण्याचे प्रकरही अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडत असताना तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, मधुकर कड, सोमनाथ तांबे यांनी यांच्यावर कडक कारवाई केल्यानंतर हा प्रकार थांबला होता, परंतु गेल्या काही महिन्यांपासन पुन्हा सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करºयाचे प्रकार वाढले होते. यावर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून शहर परिसरात महिलांच्या सुरक्षेकरिता निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असून, या पथकाच्या माध्यमातून रस्त्यावर टवाळी करणारे तसेच संशयितरीत्या दिसणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी (दि.३०) असाच प्रकार सिडकोतील उत्तमनगर भागात दुपारच्या सुमारास घडला असून, सार्वजनिक ंिंठकाणी शांतता भंग केल्या प्रकरणी पाच युवकांवर निर्भया पथकाकडून पोलीस उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने सिडको भागातील उत्तमनगर येथील महाविद्यालयासमोरच वाढदिवस साजरा करताना एकमेकांवर अंडे फेकणाºया पाच टवाळखोरांवर कारवाई करीत त्यांच्याविरु द्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.
निर्भय पथकाकडून कारवाई करण्यात आलेले पाचही महाविद्यालयीन युवक असून, महाविद्यालयासमोर तसेच मुख्य चौक, मोकळे उद्यानात असे प्रकार कायमच घडत आहेत. या माध्यमातून भाईगिरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने याबाबत पोलिसांकडून करवाई करण्याची अपेक्षा महिलावर्गाकडून करण्यात येत आहे.

Web Title: Action against five youths by fearless squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.