ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:50+5:302021-06-19T04:10:50+5:30
सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असून, सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास ...
सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची असून, सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. पर्वत रांगेतील डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठीच उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेची दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावेळी ब्रह्मगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
(फोटो १८ भुजबळ)