रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:25 PM2020-03-24T22:25:56+5:302020-03-25T00:18:35+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने २६ जणांवर कारवाई केली होती. आतापर्यंत महापालिकेने ३८ नागरिकांवर कारवाई करत, त्यांच्याकडून ३८ हजाराचा दंड वसूल केला आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर रस्त्यांवर थुंकणाऱ्यांविरोधात सुरू केलेली दंडात्मक कारवाईच्या तिसºया दिवशी १२ जणांना दंड करण्यात आला असून, त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेने २६ जणांवर कारवाई केली होती. आतापर्यंत महापालिकेने ३८ नागरिकांवर कारवाई करत, त्यांच्याकडून ३८ हजाराचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा १३ मार्चपासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार हे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, थुंकीपासून या आजाराचा प्रसार होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर एक हजार रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त गमे यांनीदेखील महापालिका हद्दीत रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर गुरुवारपासून दंड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी तिघांवर कारवाई करण्यात येवून त्यांच्याकडून तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. शुक्रवारी याविरोधातील कारवाई वाढवण्यात येऊन २३ जणांवर कारवाई करण्यात आली होती. सोमवारी शहरात १२ जणांवर याबाबत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दंड केलेल्यांचा आकडा आता ३८ पर्यंत पोहोचला असून, त्यांच्याकडून ३८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.